अयोध्येत प्रशासकीय बदल

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या व्यवस्थापनात मोठा प्रशासकीय बदल करण्यात आला आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची ट्रस्टचे पहिले मुुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती केली आहे. बुधवारी झालेल्या ट्रस्टच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मंदिराच्या वाढत्या प्रशासकीय, आर्थिक आणि कार्यकारी जबाबदा-यांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. यासोबतच ट्रस्टच्या व्यवस्थापन रचनेतही काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. महेश भागचंदका यांची कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, स्वामी गोविंददेव गिरी हे यापुढे महासचिव पदावर राहणार नाहीत. महेश भागचंदका, मदन मोहन पांडे आणि डॉ. निर्मला यादव यांची नव्या विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

जितेंद्र मिश्रा यांनी ६ डिसेंबर १९८६ रोजी भारतीय हवाई दलात फायटर पायलट म्हणून कारकीर्द सुरू केली. ३८ वर्षांहून अधिक काळ त्यांनी हवाई दलात सेवा बजावली असून त्यांच्या नावावर ३ हजारहून अधिक तासांच्या उड्डाणाचा अनुभव आहे. राष्ट्रीय संरक्षण अकादमी पुणे, एअर फोर्स टेस्ट पायलट्स स्कूल बंगळुरू, अमेरिकेतील एअर कमांड अँड स्टाफ कॉलेज आणि ब्रिटनमधील रॉयल कॉलेज ऑफ डिफेन्स स्टडीज् या प्रतिष्ठित संस्थांमध्ये त्यांनी शिक्षण घेतले आहे. लष्करी कारकीर्दीत त्यांनी फायटर स्क्वॉड्रनचे नेतृत्व केले आहे तसेच चीफ टेस्ट पायलट म्हणूनही त्यांनी काम केले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान त्यांनी वेस्टर्न एअर कमांडचे नेतृत्व केले होते. लष्करी सेवेसाठी त्यांना अति विशिष्ट सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदक यासह अनेक सन्मान मिळाले आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या मिश्रा यांचे वडील व्याख्याते होते.सीईओ पदासाठी देशभरातून ५,५८५ अर्ज प्राप्त झाले होते. यातील १६ उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली. त्यांची पार्श्वभूमी, अनुभव, व्यक्तिमत्त्व आणि व्यावसायिक क्षमता या निकषांवर मूल्यांकन करण्यात आले.

अखेर एअर मार्शल जितेंद्र मिश्रा, मेजर जनरल संजय प्रताप सिंह आणि श्रुती भारद्वाज या तीन नावांची शिफारस करण्यात आली होती. नियुक्त सीईओंकडे कायदेशीर, प्रशासकीय आणि आर्थिक बाबींची जबाबदारी राहणार आहे. संस्थेच्या आकारमान आणि कामकाजानुसार आवश्यक प्रणाली, प्रक्रिया आणि कार्यपद्धती विकसित करण्याचे कामही सीईओंकडे सोपवले जाणार आहे. ट्रस्टच्या बैठकीत कथित देणगी चोरी प्रकरणी विशेष चौकशी पथकाच्या (एसआयटी) चौकशीचाही आढावा घेण्यात आला. २६ जून रोजी चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी राजीनामा दिला होता. मंदिरात जमा होणा-या रोख देणगीच्या मोजणीमध्ये मानवी हस्तक्षेप कमी करण्याच्या उपायांवरही बैठकीत चर्चा झाली. यासाठी दोन बँका आणि एका आयआयटीकडून प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. ट्रस्टने २०२५-२६ या आर्थिक वर्षाचे वार्षिक लेखे मंजूर केले आहेत. या वर्षात ट्रस्टचे एकूण उत्पन्न २३७ कोटी रुपये तर खर्च ११ कोटी रुपये असल्याचे नमूद करण्यात आले. मंदिर बांधकाम आणि संबंधित कामांवरील भांडवली खर्च ४२५ कोटी रुपये होता.

३१ मार्च २०२६ रोजी ट्रस्टकडे उपलब्ध एकूण निधी १,८८२ कोटी रुपये असल्याची माहिती देण्यात आली. राम मंदिराचे प्रशासन सांभाळण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय राम मंदिर ट्रस्टने घेतला. २०२०मध्ये ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर राम मंदिर व्यवस्थापनात होणारा हा सर्वांत मोठा प्रशासनिक बदल आहे. राम मंदिराच्या सध्याच्या व्यवस्थापनानुसार, राम मंदिराशी संबंधित महत्त्वाचे निर्णय विश्वस्त घेतात. राम मंदिराचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी सीईओची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतातील अनेक जुन्या व महत्त्वाच्या मंदिरांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सीईओंकडे सोपवण्यात आली आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानचा कारभार एक आयएएस कार्यकारी अधिकारी पाहतात. वैष्णोदेवी मंदिराचे व्यवस्थापनही सीईओ पाहतात. जगन्नाथ मंदिराचे व्यवस्थापन मुख्य प्रशासकाच्या आणि काशी विश्वनाथ मंदिराचे व्यवस्थापन कार्यकारी अधिका-यांच्या देखरेखीत चालते. राम मंदिर देणगीत अपहार झाल्याच्या आरोपानंतर सीईओची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|मायक्रो फायन्सच्या कर्जातून 26 वर्षीय युवकाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये नेमकं सांगितलं?
01:22
Video thumbnail
जळकोट तालुक्यातील माळहिप्परगा येथे ऊस जळून खाक #breakingnews #marathinews
01:05
Video thumbnail
Nanded|खासदारांच्या गावातच मायक्रो फायनान्सचा वसुलीचा तगादा? महिलांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव
04:15
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा परिषदेत अनागोंदी कारभाराचा आरोप! आशाताई भिसेंनी मांडले कागदपत्रे
03:55
Video thumbnail
Nanded|नांदेड शेतकरी चंद्रकांत शिंदे खून प्रकरण: तिघांना ३ दिवसांची पोलीस कोठडी, संचालक फरार
01:00
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पाणीचोरीविरोधात मोठी कारवाई! २८ अनधिकृत नळजोडण्या तोडल्या, पाइप जप्त
02:24
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये ‘स्वस्त दिवाळी, मस्त दिवाळी’ महोत्सव! महिला उद्योजिका पॉवर बाजार ३० ऑक्टोबरपासून
02:35
Video thumbnail
Latur|लातूर बसस्थानकात घाणीचं साम्राज्य! काँग्रेसची पाहणी, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न
07:52
Video thumbnail
Latur|लातूर रोडवर कबीर गॅरेजमध्ये चोरी! ऑक्सिजन सिलेंडर लंपास, चाकूर पोलिसांत गुन्हा दाखल
01:05
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये शेतीच्या वादातून दोन गटांत हाणामारी | हैबतपूर शिवारातील घटना
00:59
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये साडेचार कोटींचं बसस्थानक तयार, उद्घाटन कधी? | विद्युत फिटिंगचं काम रखडलं
01:00
Video thumbnail
Nanded|केएफ फायनान्स आणि कुबेरफल एकच? शेतकरी मृत्यू प्रकरणात पोलीस अधीक्षकांचा मोठा खुलासा
02:13
Video thumbnail
“नाना पटोले काय माझे मालक आहेत का?” अशोक चव्हाणांचा संतप्त सवाल #breakingnews #digitalekmat
00:27
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये उपवर्गीकरण आरक्षणाविरोधात मोर्चा | आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर
01:43
Video thumbnail
Latur|बेलगावात शॉर्टसर्किटमुळे ऊसपिकाला आग |३ एकर ऊस जळून खाक, साडेचार लाखांचे नुकसान #breakingnews
01:05

Latest news