नांदेड : प्रतिनिधी भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंचन नगर परिसरातील बुद्ध विहाराजवळ जुन्या भांडणाच्या कारणावरून प्रतीक ससाने या तरुणावर धारदार शस्त्राने ४ सप्टेंबर रोजी हल्ला करण्यात आला होता. उपचारादरम्यान प्रतीक ससाने याचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक ससाणे हा सिंचन नगर परिसरातील बुद्ध विहाराजवळ असताना जुन्या भांडणाच्या कारणावरून मयूर लोणे (रा. झेंडा चौक) आणि एका अल्पवयीन मुलाने त्याच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी धारदार शस्त्राचा वापर करून प्रतीकच्या शरीरावर अनेक वार केल्याने तो गंभीर जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच भाग्यनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रतीक ससाणे याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी हल्लेखोरांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान प्रतीक ससाने याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
















