राज्यात ५ वर्षांत ४७ लाख नागरिकांना कुत्र्यांचा चावा

पुणे : राज्यात भटक्या श्वानांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. २०२१ ते २०२५ या पाच वर्षांत राज्यात तब्बल ४७ लाख ३७ हजार ७६३ नागरिकांना कुर्त्यांनी चावा झाला आहे. यामध्ये मुंबईत सर्वाधिक ५ लाख २९ हजार ६५० जणांना चावा घेतला. याशिवाय मांजर आणि माकडांच्या हल्ल्यांमुळेही नागरिक जखमी होत असून, गेल्या पाच वर्षांत या तीन प्राण्यांच्या चाव्यामुळे राज्यात १३४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथील सामाजिक कार्यकर्ते कमलाकर दरवडे यांनी माहितीच्या अधिकारातून ही माहिती मिळवली आहे. भटक्या श्वानांचा वाढता उपद्रव आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने विविध निर्देश दिले आहेत. यामध्ये श्वानांचे निर्बीजीकरण, लसीकरण आणि जंतनाशक उपचार करणे तसेच रेबीजग्रस्त किंवा आक्रमक श्वानांना पुन्हा रस्त्यावर सोडू नये. शाळा, रुग्णालये, यांसारख्या संवेदनशील ठिकाणांवरील भटके श्वान हटवून त्यांना निवारा केंद्रात ठेवावे. प्रत्येक जिल्ह्यात किमान एक कार्यरत एबीसी केंद्र असावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

प्राण्यांच्या चाव्यामुळे जखमी नागरिक
श्वान : ४७,३७,७६३
मांजर : ४,६६,३९२
माकड : ४३,९५५

टॉप पाच जिल्हे
मुंबई, ठाणे, अहिल्यानगर, कोल्हापूर, पुणे

अवमान याचिका करणार
या समस्येची तीव्रता शासनाच्या निदर्शनास यावी, यासाठी माहितीच्या अधिकारातून ही आकडेवारी मिळविली आहे. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही, तर न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार आहे, असे सामाजिक कार्यकर्ते कमलाकर दरवडे यांनी सांगितले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूर काँग्रेसची नवी कार्यकारणी मैदानात; दुष्काळाच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका
04:08
Video thumbnail
Latur|महापुरुषांचा आदर्श घ्या आणि ध्येय निश्चित करा! – डीवायएसपी अक्षय जाधव
04:44
Video thumbnail
Latur|अंधारात अजगराचा थरार! सेलूत सर्पमित्राने केली सुरक्षित सुटका
01:52
Video thumbnail
Latur|मुख्याध्यापक युवराज शिंदेंनी केली एकमतच्या गणरायाची आरती
02:44
Video thumbnail
Latur|हैदराबाद मुक्तिसंग्रामातील संघर्षयोद्धा राजा हरिश्चंद्र जाधवांचा पुतळा अनावरण
06:19
Video thumbnail
Nanded|आधी कचरा टाकला... मग त्याच कचऱ्याची केली स्वच्छता! नांदेड महापालिकेचा कारभार चर्चेत
01:23
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
11:55
Video thumbnail
Babasaheb Patil|खरीप पिकांच्या नुकसानीवर सरकारचा प्लॅन काय? सहकारमंत्र्यांनी दिलं उत्तर
01:37
Video thumbnail
Latur|जळकोटच्या स्वातंत्र्यसैनिकांचा निजामाविरोधातील लढा आजही इतिहासात जिवंत
02:50
Video thumbnail
Latur|मांजरा धरणातून पाणी चोरीचा धक्कादायक प्रकार
04:05
Video thumbnail
Latur|डॉ. विजयकुमार यादव यांच्या हस्ते एकमत कार्यालयातील श्रीगणेशाची आरती
01:39
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन; हुतात्म्यांना मानाचा मुजरा
00:50
Video thumbnail
Renapur|हातभट्टीच्या अड्ड्यांवर रेणापूर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’!
01:46
Video thumbnail
Nanded|मराठा आरक्षणावर शिवेंद्रराजे भोसले स्पष्ट बोलले; ‘सरकार निर्णय घेणारच नाही असं नाही’
11:32
Video thumbnail
Nanded|35 जणांना एकच जमीन विकली; नांदेड पोलिसांची मोठी कारवाई
02:55

Latest news