उपोषण स्थगित

दीर्घ काळापासून बेमुदत उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची गुरूवारी पहाटे राज्य सरकारच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची अधिकृत विनंती केली. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दादा भुसे, आमदार प्रसाद लाड यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाशी कडक आणि आक्रमक सुरात चर्चा करताना मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवर, सरकारच्या नितीवर गंभीर सवाल उपस्थित केले.

शिष्टमंडळासोबतच्या चर्चेदरम्यान जरांगे पाटील यांनी ठामपणे सांगितले की, शासनाने गॅझेटियरची अंमलबजावणी केवळ शब्दांत न सांगता तात्काळ जीआर काढून करावी. न्या. शिंदे समितीने शोधलेल्या ५८ लाख कुणबी नोंदीपैकी एकही नोंद कमी होणार नाही याचे लेखी आश्वासन आम्हाला हवे आहे. या ५८ लाख नोंदीचे वितरण करणे आणि त्यांना कायदेशीर वैधता देण्याबाबत खुद्द मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांसमोर येऊन शब्द द्यावा तसेच सातारा संस्थानचे गॅझेटियर लागू करण्यासाठी सरकारला ३ महिन्यांची मुदत देण्याची तयारी दर्शवताना जरांगे यांनी स्पष्ट केले की, या सर्व नोंदीवर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी असावी आणि शासनाने आता मराठा समाजाची फसवणूक करणे थांबवावे. चर्चेदरम्यान जरांगे यांनी नुकत्याच काढण्यात आलेल्या शासकीय अध्यादेशांचा दाखला देत सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, ९ सप्टेंबर रोजी राज्य सरकारने वैश्य वाणी आणि हिंदू वाणी समाजासाठी जीआर काढून त्यांना आरक्षणाचा लाभ दिला. स्वातंत्र्यपूर्व काळात मराठा समाज कुणबीच होता.

नजरचुकीने तो आरक्षणापासून वंचित राहिला, असा उल्लेख जसा त्यांच्या जीआरमध्ये केला आहे तसाच जीआर मराठा समाजासाठी काढण्यास सरकारला काय अडचण आहे? इतर समाजासाठी एक न्याय आणि मराठा समाजासाठी वेगळा न्याय का? गिरीश महाजन यांच्या काळात कोणत्याही मोठ्या मागणीशिवाय ५६ जातींचा आरक्षणात समावेश करण्यात आला. १९०१ ची जनगणना आणि १८८४ च्या गॅझेटची नोंद असताना मराठवाडा आणि महाराष्ट्रातील मराठी समाजालाच आरक्षणापासून दूर का ठेवले जात आहे? मराठा समाजाच्या परिस्थितीवर बोलताना जरांगे म्हणाले, केवळ ५ टक्के मराठा श्रीमंत किंवा सत्तेत असले म्हणून संपूर्ण समाज श्रीमंत होत नाही. उर्वरित ९५ टक्के गरीब मराठ्यांच्या पोरांचे काय? स्वातंत्र्यपूर्व काळात मराठवाड्यातील संपूर्ण मराठा समाज आरक्षणात होता. आंदोलनापुरते आश्वासन देऊन पुन्हा त्याकडे दुर्लक्ष करण्याची प्रशासनाची सवय आता चालणार नाही. हैदराबाद गॅझेटनुसार, संख्येनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन व्हॅलिडिटी द्यावीच लागेल. सरकारच्या भूमिकेवरच आंदोलनाची पुढील दिशा ठरणार असल्याचे जरांगे यांनी बजावले. बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे मनोज जरांगे यांनी आपले उपोषण ९० दिवसांसाठी स्थगित करण्याची अधिकृत घोषणा केली.

सरकारच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळासोबत सुमारे दीड तास चाललेल्या प्रदीर्घ आणि सरकारात्मक चर्चेनंतर जरांगे यांनी हा निर्णय घेतला. उपोषण सोडले तरी मराठा आरक्षणाचा लढा सुरूच राहील, असे स्पष्ट करत त्यांनी आधीच मुंबई गाठलेल्या सुमारे १ लाख समर्थकांना शांततेत माघारी फिरण्याचे आवाहन केले. शिष्टमंडळासमवेत चर्चेदरम्यान जरांगे म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माझे वैरी नाहीत मात्र समोरून राजकीय वार झाले तर शांत बसणार नाही. आरक्षणापेक्षा मराठा समाजाचा सन्मान आणि इज्जत अधिक महत्त्वाची आहे. प्रशासनाने आता मराठा समाजाची फसवणूक न करता दिलेल्या ९० दिवसांच्या कालावधीत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्यात, असे त्यांनी बजावले. हिंदू वाणी, हिंदू वैश्य आणि वैश्य वाणी या तिन्ही जाती एकच असल्याचा सुधारित जीआर काढला जातो मग याच धर्तीवर ‘मराठा आणि कुणबी एकच आहेत’, असा जीआर सरकार का काढत नाही? असा सवाल जरांगे यांनी केला. आता ९० दिवसांत शासनाने मराठा समाजाला पुन्हा धोका दिला तर संपूर्ण मराठा समाज थेट मुंबई गाठून बेमुदत आंदोलन उभारेल, असा इशारा देण्यात आला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Babasaheb Patil|लातूर जिल्हा बँक संचालक पदाबाबत RBI चा मोठा निर्णय;बाबासाहेब पाटील यांना केलं बडतर्फ
01:15
Video thumbnail
Sanjay Jadhav|‘दुष्काळ आहे तर मग कोणी खात नाही का?’ काजू-बदामावर जाधवांचा सवाल
03:16
Video thumbnail
Nanded Breaking|दुष्काळावर गंभीर चर्चा अन् टेबलवर काजू-बदाम; नांदेडमध्ये चर्चांना उधाण
00:39
Video thumbnail
Nanded Breaking|नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न; गाडीसमोर काँग्रेसची घोषणाबाजी
01:22
Video thumbnail
Latur|पावसाळा संपत आला, पण तिरू नदीत पाण्याचा थेंबही नाही!
02:20
Video thumbnail
Latur|30 हजारांचा खर्च... अन् उभ्या टोमॅटो पिकावर रोटावेटर! शेतकऱ्याचा धक्कादायक निर्णय
02:01
Video thumbnail
Latur|औसेकरांच्या नळाला गढूळ पाणी; स्वच्छ पाण्याची नागरिकांची मागणी
01:05
Video thumbnail
Nanded|दुष्काळी भागांच्या पाहणीसाठी कृषिमंत्री बांधावर; नांदेडपासून पाहणीला सुरुवात
06:56
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
12:18
Video thumbnail
Latur|मध्यरात्री पावसाची तुफान बॅटिंग; तावरजा नदी खळखळून वाहू लागली!
03:35
Video thumbnail
Latur|राजा मणियार यांच्या आरोपांना मस्के बंधूंचा पलटवार; पत्रकार परिषदेत कागदपत्रे सादर
08:28
Video thumbnail
Latur Traffic Police|लातूरकरांनो लक्ष द्या!बस स्टँड ते शाहू कॉलेज मार्ग बंद; वन वेची अंमलबजावणी सुरू
03:02
Video thumbnail
Latur|लातूर काँग्रेसची नवी कार्यकारणी मैदानात; दुष्काळाच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका
04:08
Video thumbnail
Latur|महापुरुषांचा आदर्श घ्या आणि ध्येय निश्चित करा! – डीवायएसपी अक्षय जाधव
04:44
Video thumbnail
Latur|अंधारात अजगराचा थरार! सेलूत सर्पमित्राने केली सुरक्षित सुटका
01:52

Latest news