न्यायालयाबाबत वक्तव्य; संजय राऊत यांच्यासह अन्य प्रतिवादींना नोटीस

छत्रपती संभाजीनगर – न्यायालय व न्यायालयीन प्रक्रियेवर अवमानकारक व आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, राज्यसभा सदस्य संजय राजाराम राऊत यांच्यासह इतर प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. सी. मोरे व न्यायमूर्ती वैशाली जाधव-पाटील यांनी दिले आहेत.

या प्रकरणी ॲड. अमित देशपांडे यांनी ॲड. शैलेंद्र गंगाखेडकर यांच्यामार्फत फौजदारी अवमान याचिका दाखल केली आहे. या याचिकेनुसार शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय आणि एकूणच न्यायव्यवस्था यांच्याविषयी अनेकवेळा अवमानकारक वक्तव्य विविध माध्यमांवर केले आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या अवमानाविषयी राज्याचे तत्कालीन महाधिवक्ता यांचेकडे संजय राऊत व इतर यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल करण्यासंदर्भात कायद्यान्वये संमती मागितली होती.

खासदार संजय राऊत यांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्यांचा विचार करून राज्याचे विद्यमान महाधिवक्ता डॉ. मिलिंद साठे यांनी अँड अमित देशपांडे यांना फौजदारी अवमान याचिका दाखल करण्यासंदर्भात परवानगी दिली. त्या अनुषंगाने ॲड अमित देशपांडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात फौजदारी अवमान याचिका ॲड शैलेंद्र गंगाखेडकर यांचे मार्फत दाखल केली.

संजय राऊत यांनी केलेली अवमानकारक वक्तव्य टीव्ही नाइन मराठी, एबीपी माझा, आपलं महानगर,दिव्य मराठी आणि महाराष्ट्र टाइम्स इत्यादी माध्यमांवर प्रसिद्ध झाले होते. म्हणून याचिकेत प्रतिवादी असलेल्या या सर्व माध्यमांच्या संपादकांनाही सदर फौजदारी अवमान याचिकेत कोर्टाने नोटीस काढून हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातुरात झाडातून अवतरले गणराय; अनोख्या देखाव्याने वेधलं लक्ष!
04:37
Video thumbnail
🔴 LIVE - एकमत कार्यालयातील गणरायाची आरती |EKMAT DIGITAL
12:45
Video thumbnail
Latur| डुप्लिकेट आमदारांना सांभाळू नका; देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावर अभय साळुंके थेट बोलले
08:03
Video thumbnail
Latur|लातूर-तुळजापूर महामार्गावर राष्ट्रवादीचा रास्ता रोको
03:13
Video thumbnail
Latur|नानिकभाई जोधवानी यांच्या हस्ते एकमत कार्यालयातील गणरायाची आरती संपन्न
05:07
Video thumbnail
Latur|मोईजभाई शेख यांच्या आठवणींना काँग्रेस नेत्यांकडून उजाळा
05:40
Video thumbnail
Latur|लक्ष्मण ढोबळेंच्या वक्तव्याविरोधात महिलांचा संताप
02:00
Video thumbnail
Latur|महादेव उबाळे यांच्या हस्ते एकमत कार्यालयातील आरती संपन्न
08:58
Video thumbnail
🔴 LIVE - एकमत कार्यालयातील गणरायाची आरती |EKMAT DIGITAL
12:44
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये सफाई कामगारांचा ‘झाडू मोर्चा’; ईपीएफची रक्कम देण्याची मागणी
02:02
Video thumbnail
Latur|शासन निर्णयाची होळी! ग्रामरोजगार सहाय्यकांचा थेट इशारा
03:28
Video thumbnail
Latur|तुटपुंजी मदत नको! शेतकऱ्यांना भरीव मदतीची मागणी
06:34
Video thumbnail
Latur| देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर शेतकऱ्यांनी थेटच बोलले
10:40
Video thumbnail
CM Devendra Fadanvis|दोन दिवसांत जीआर! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा
05:52
Video thumbnail
🔴 LIVE मुख्यमंत्री फडणवीस आज लातूर दौऱ्यावर; शेतकऱ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया| Ekmat Digital
12:19

Latest news