औसा येथे शरद पवार गटाच्या वतीने रास्ता रोको  

औसा : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष औसा तालुक्याच्या वतीने (दि. २४ सप्टेंबर २०२६) गुरुवार रोजी सकाळी ११.४५ वाजता औसा टि-पॉईन्ट  चौकात सुमारे पाऊण तास रास्ता रोको आंदोलन करीत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हे आंदोलन राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
  औशावर दुष्काळाचे संकट आले आहे. सरकार मात्र गाढ झोपेत आहे आता आपण शेतक-यांसाठी गप्प बसणार नाही. दुष्काळ जाहीर करा आणि शेतकरी, शेतमजूर व विद्यार्थ्यांना तातडीने मदत द्या. औशातील शेतकरी संकटात आहे. शेतमजूर अडचणीत आहे आणि विद्यार्थ्यांवर शिक्षणाचा आर्थिक भार वाढत आहे. औसा तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करा. शेतक-यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान तातडीने द्या, शेतमजुरांना प्रति हेक्टरी २५ हजार रुपये मदत द्या, जनावरांसाठी चारा डेपो तात्काळ सुरू करा, विद्यार्थ्यांची शैक्षणिक शूल्क माफ करा, विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलसाठी अनुदान द्या, विद्यार्थ्यांच्या मेससाठी अनुदान देण्यात यावे आदी मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. सरकारने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने ठोस निर्णय घ्यावेत. आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष मदत हवी आहे.
औसा तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने मोठी दडी मारल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीन उघडून गेले असून शेतक-यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे औसा तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतक-यांना सरसकट मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या नेतृत्वाखाली व औसा तालुकाध्यक्ष नरेंद्र राजेंद्र पाटील यांनी आंदोलन करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.  या आंदोलनात युवक मराठवाडा विभागाध्यक्ष प्रशांत घार, पक्षाचे माजी प्रवक्ते शिवराज बांगर, युवक प्रदेश सरचिटणीस रामेश्वर पवार, प्रशांत घोलप, उमेश गायकवाड यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातुरात झाडातून अवतरले गणराय; अनोख्या देखाव्याने वेधलं लक्ष!
04:37
Video thumbnail
🔴 LIVE - एकमत कार्यालयातील गणरायाची आरती |EKMAT DIGITAL
12:45
Video thumbnail
Latur| डुप्लिकेट आमदारांना सांभाळू नका; देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावर अभय साळुंके थेट बोलले
08:03
Video thumbnail
Latur|लातूर-तुळजापूर महामार्गावर राष्ट्रवादीचा रास्ता रोको
03:13
Video thumbnail
Latur|नानिकभाई जोधवानी यांच्या हस्ते एकमत कार्यालयातील गणरायाची आरती संपन्न
05:07
Video thumbnail
Latur|मोईजभाई शेख यांच्या आठवणींना काँग्रेस नेत्यांकडून उजाळा
05:40
Video thumbnail
Latur|लक्ष्मण ढोबळेंच्या वक्तव्याविरोधात महिलांचा संताप
02:00
Video thumbnail
Latur|महादेव उबाळे यांच्या हस्ते एकमत कार्यालयातील आरती संपन्न
08:58
Video thumbnail
🔴 LIVE - एकमत कार्यालयातील गणरायाची आरती |EKMAT DIGITAL
12:44
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये सफाई कामगारांचा ‘झाडू मोर्चा’; ईपीएफची रक्कम देण्याची मागणी
02:02
Video thumbnail
Latur|शासन निर्णयाची होळी! ग्रामरोजगार सहाय्यकांचा थेट इशारा
03:28
Video thumbnail
Latur|तुटपुंजी मदत नको! शेतकऱ्यांना भरीव मदतीची मागणी
06:34
Video thumbnail
Latur| देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर शेतकऱ्यांनी थेटच बोलले
10:40
Video thumbnail
CM Devendra Fadanvis|दोन दिवसांत जीआर! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा
05:52
Video thumbnail
🔴 LIVE मुख्यमंत्री फडणवीस आज लातूर दौऱ्यावर; शेतकऱ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया| Ekmat Digital
12:19

Latest news