माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंच्या कथित वक्तव्याविरोधात महिलांचा आक्रोश

लातूर : प्रतिनिधी
नांदेड येथे १३ सप्टेंबर रोजी अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ आयोजित मोर्चादरम्यान माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी महार समाजातील महिला व मुलींबाबत कथितरीत्या आक्षेपार्ह, अवमानकारक व जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी लातूर शहरातील गांधी चौक येथे महिलांनी जोडे मारो आंदोलन केले. यावेळी ढोबळे यांना त्वरित अटक करा अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
या कथित वक्तव्यामुळे बौद्ध समाजातील महिला, मुली व कुटुंबीय व समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप आंदोलनकर्त्या महिलांनी केला. सार्वजनिक मंचावरून एका विशिष्ट समाजातील महिलांविषयी अपमानास्पद, लैंगिक स्वरूपाची भाषा वापरणे ही गंभीर बाब असून, दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनानंतर गांधी चौक पोलीस निरीक्षक, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर आशाताई चिकटे, सुजाता अजनीकर, सरिता बनसोडे, अर्चना जाधव, मयुरी अल्टे, त्रिशला घोडके, नीता अजनीकर, रेखा घोबाळे, ज्योती कांबळे, मीरा कांबळे, कविता कदम, निर्मला गौरकर, ललिता गायकवाड, बबीता गुळवे, शशिकला सुरवसे, कमलबाई गाडे, विद्या सुरवसे, प्रमिला आपटे, मीनाक्षी गंडले, सुबीद्रा कांबळे, मीना कदम, विनोद कोल्हे, विलास चक्रे, अक्षय धावारे, ज्ञानेश्वर सुरवसे, उमाकांत धावारे, सुफी सय्यद, बबलू गवळी, राजेश कदम, मिलिंद धावारे यांच्यासह शेकडो महिलांच्या स्वाक्ष-या आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातुरात झाडातून अवतरले गणराय; अनोख्या देखाव्याने वेधलं लक्ष!
04:37
Video thumbnail
🔴 LIVE - एकमत कार्यालयातील गणरायाची आरती |EKMAT DIGITAL
12:45
Video thumbnail
Latur| डुप्लिकेट आमदारांना सांभाळू नका; देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावर अभय साळुंके थेट बोलले
08:03
Video thumbnail
Latur|लातूर-तुळजापूर महामार्गावर राष्ट्रवादीचा रास्ता रोको
03:13
Video thumbnail
Latur|नानिकभाई जोधवानी यांच्या हस्ते एकमत कार्यालयातील गणरायाची आरती संपन्न
05:07
Video thumbnail
Latur|मोईजभाई शेख यांच्या आठवणींना काँग्रेस नेत्यांकडून उजाळा
05:40
Video thumbnail
Latur|लक्ष्मण ढोबळेंच्या वक्तव्याविरोधात महिलांचा संताप
02:00
Video thumbnail
Latur|महादेव उबाळे यांच्या हस्ते एकमत कार्यालयातील आरती संपन्न
08:58
Video thumbnail
🔴 LIVE - एकमत कार्यालयातील गणरायाची आरती |EKMAT DIGITAL
12:44
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये सफाई कामगारांचा ‘झाडू मोर्चा’; ईपीएफची रक्कम देण्याची मागणी
02:02
Video thumbnail
Latur|शासन निर्णयाची होळी! ग्रामरोजगार सहाय्यकांचा थेट इशारा
03:28
Video thumbnail
Latur|तुटपुंजी मदत नको! शेतकऱ्यांना भरीव मदतीची मागणी
06:34
Video thumbnail
Latur| देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर शेतकऱ्यांनी थेटच बोलले
10:40
Video thumbnail
CM Devendra Fadanvis|दोन दिवसांत जीआर! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा
05:52
Video thumbnail
🔴 LIVE मुख्यमंत्री फडणवीस आज लातूर दौऱ्यावर; शेतकऱ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया| Ekmat Digital
12:19

Latest news