लातुरात १६ ठिकाणी श्री मूर्ती संकलन केंद्रांची उभारणी

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने गणेश विसर्जनाची तयारी करण्यात येत आहे. यावर्षीही मनपाच्या वतीने गणेश मूर्तींचे संकलन केले जाणार असून त्यासाठी १६ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळही उपलब्ध करून देण्यात आले आहे.आयुक्तानी बुधवारी प्रमुख विसर्जन मार्गांची पाहणीही केली. शहरातील प्रभाग क्रमांक २, ३  व ७  साठी नांदेड रस्त्यावर यशवंत शाळा, प्रभाग क्रमांक २ व ३  मधील गणेश भक्तांसाठी विवेकानंद चौकातील पाण्याची टाकी, प्रभाग ५ व १८ साठी मंठाळे नगर मधील मनपा शाळा क्रमांक ९, प्रभाग १ व ८ मधील नागरिकांसाठी सिद्धेश्वर मंदिर, प्रभाग ११ व १२ साठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूस शासकीय विहीर तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाण्याच्या टाकीजवळ मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले आहे.
दयानंद महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये प्रभाग १० व १३ मधील नागरिकांना गणेश मूर्ती देता येतील.सरस्वती कॉलनीतील पाण्याची टाकी येथे प्रभाग १४ व १५ तर टाऊन हॉल येथे प्रभाग ९ तसेच प्रभाग १५ व १६ मधील भक्तांना संकलन केंद्राची सुविधा उपलब्ध आहे.प्रभाग १५ व १७ मधील नागरिकांसाठी बांधकाम भवन तर ६ व १८ या प्रभागातील नागरिकांना कव्हा रोड येथे संकलन केंद्र उपलब्ध आहे. प्रभाग ६ व ७ साठी साळे गल्लीत यशवंत शाळा तर प्रभाग १० व १४ साठी साई रस्त्यावर तिवारी यांच्या विहिरीजवळ मूर्ती संकलन केंद्र स्थापित करण्यात येणार आहे. प्रभाग ५ साठी तावरजा कॉलनीतील गणेश नगर तर प्रभाग १० व ११ साठी काशी विश्वेश्वर ग्रीन बेल्ट येथे मूर्ती संकलन केंद्र असणार आहे. प्रभाग ९ साठी अंबाजोगाई रस्त्यावर एसटी वर्कशॉप समोर मूर्ती संकलन केंद्र उपलब्ध असेल.
प्रत्येक मूर्ती संकलन केंद्रासाठी प्रत्येकी ५० कर्मचारी नेमण्यात आले आहेत. एकूण ९०० कर्मचारी विसर्जनासाठी कार्यरत असतील.मूर्ती वाहून नेण्यासाठी ४५ आयशर वाहने,४ क्रेन, २  जेसीबी तसेच विसर्जन तलावाच्या ठिकाणी २० प्रशिक्षित पोहणारे कर्मचारी तसेच अग्निशमन विभागाचे २० प्रशिक्षित कर्मचा-यांचे पथक वाहन व यंत्रणेसह उपलब्ध राहणार आहे. प्रत्येक मूर्ती संकलन केंद्रावर घरगुती ४ फुटापर्यंतच्या मूर्ती संकलित केल्या जाणार आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांनी आपल्या मोठ्या मूर्ती स्वत:च्या वाहनाने १२ नंबर पाटी येथे विमानतळ रस्त्यावर आणून दिल्यास मनपाच्या वतीने आवश्यक यंत्रणा उपलब्ध करून देत त्यांचे विसर्जन करता येणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी आपल्या मूर्ती या ठिकाणापर्यंत आणून देत महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. बुधवारी मनपा आयुक्त राहुल कुलकर्णी, उपायुक्त वसुधा फड यांनी प्रमुख विसर्जन मार्ग तसेच मूर्ती संकलन केंद्रांची पाहणी करून आवश्यक त्या सूचना केल्या.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातुरात झाडातून अवतरले गणराय; अनोख्या देखाव्याने वेधलं लक्ष!
04:37
Video thumbnail
🔴 LIVE - एकमत कार्यालयातील गणरायाची आरती |EKMAT DIGITAL
12:45
Video thumbnail
Latur| डुप्लिकेट आमदारांना सांभाळू नका; देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावर अभय साळुंके थेट बोलले
08:03
Video thumbnail
Latur|लातूर-तुळजापूर महामार्गावर राष्ट्रवादीचा रास्ता रोको
03:13
Video thumbnail
Latur|नानिकभाई जोधवानी यांच्या हस्ते एकमत कार्यालयातील गणरायाची आरती संपन्न
05:07
Video thumbnail
Latur|मोईजभाई शेख यांच्या आठवणींना काँग्रेस नेत्यांकडून उजाळा
05:40
Video thumbnail
Latur|लक्ष्मण ढोबळेंच्या वक्तव्याविरोधात महिलांचा संताप
02:00
Video thumbnail
Latur|महादेव उबाळे यांच्या हस्ते एकमत कार्यालयातील आरती संपन्न
08:58
Video thumbnail
🔴 LIVE - एकमत कार्यालयातील गणरायाची आरती |EKMAT DIGITAL
12:44
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये सफाई कामगारांचा ‘झाडू मोर्चा’; ईपीएफची रक्कम देण्याची मागणी
02:02
Video thumbnail
Latur|शासन निर्णयाची होळी! ग्रामरोजगार सहाय्यकांचा थेट इशारा
03:28
Video thumbnail
Latur|तुटपुंजी मदत नको! शेतकऱ्यांना भरीव मदतीची मागणी
06:34
Video thumbnail
Latur| देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर शेतकऱ्यांनी थेटच बोलले
10:40
Video thumbnail
CM Devendra Fadanvis|दोन दिवसांत जीआर! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा
05:52
Video thumbnail
🔴 LIVE मुख्यमंत्री फडणवीस आज लातूर दौऱ्यावर; शेतकऱ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया| Ekmat Digital
12:19

Latest news