उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची लोह्यात दुष्काळसदृश भागाची पाहणी

नांदेड/लोहा : प्रतिनिधी

पावसाने खंड दिल्यामुळे राज्याच्या बहुतांश भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतक-यांच्या बांधावर जाऊन थेट आम्ही पाहणी करत आहोत. सरकार शेतक-यांना वा-यावर सोडणार नाही. पाणी समस्या,पशुधन, चारा तसेच शेतक-यांच्या मुलांचे शिक्षण यासाठी राज्यसरकार शेतक-याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार आहे, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोनखेड परिसरात पीक पाहणी करताना शेतक-यांना आश्वासित केले.

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शनिवारी (२६ सप्टेंबर) जिल्ह्याच्या दुष्काळ पीक पाहणी दौ-यावर आल्या होत्या. सकाळी साडे नऊ वाजता कंधार रस्त्यावरील शिवाजी वाघमारे आणि सोनखेड परिसरातील शेतात त्यांनी सोयाबीन पिकाची पाहणी केली. त्याच्या सोबत राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, शिक्षक आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी राहुल कडीर्ले, माजी आ. मोहन हंबर्डे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर नगराध्यक्ष शरद पाटील पवार, जिल्ह्याध्यक्ष रावणगावकर, माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, उपनगराध्यक्ष करीम शेख, माजी नगराध्यक्ष केशवराव मुकदम,माजी उपनगराध्यक्ष दता वाले, हरिभाऊ चव्हाण, भास्कर पवार ,जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील उपविभागीय अधिकारी नरवटे, तहसीलदार विठ्ठल परळीकर कंधार तहसीलदार रामेश्वर गोरे, माजी नगराध्यक्ष अनुसया केंद्रे, माजी सभापती बाबुराव केंद्रे, कंधार उपनगराध्यक्ष मनान चौधरी, जफ्रॉद्दीन बाहोद्दीन यासह शेतकरी उपस्थित होते .

केवळ कागदावरील आकडेवारीपेक्षा प्रत्यक्ष पाहणीनुसार पंचनामे करण्याचे आदेश संपूर्ण प्रशासनाला देण्यात आले आहेत. जे रिपोर्ट येतील त्यावर सरकार तात्काळ अ‍ॅक्शन घेणार आहे,असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील १४ तालुके दुष्काळग्रस्त; २ वगळले

महाराष्ट्र शासनाच्या २५ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार, खरीप २०२६ मधील परिस्थिती लक्षात घेऊन नांदेड जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. तर मुदखेड व मुखेड तालुके वगळण्यात आले आहेत. यामुळे शेतकरी आक्रमब झाले आहेत. शासनाने नायगाव,नांदेड, बिलोली, देगलूर, कंधार, लोहा, अर्धापूर, हिमायतनगर, हदगाव, माहूर, किनवट, भोकर, धमार्बाद, उमरी हे १४ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
🔴 LIVE -विजयकुमार घाडगे पाटील यांच्या उपोषणस्थळी आदित्य ठाकरे दाखल
07:28
Video thumbnail
🔴 LIVE -विजयकुमार घाडगे पाटील यांच्या उपोषणस्थळी आदित्य ठाकरे दाखल
07:45
Video thumbnail
🔴 LIVE -लातूरमध्ये आदित्य ठाकरेंचा दौरा; नुकसानग्रस्त शेतीची पाहणी
28:39
Video thumbnail
महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर! 355 तालुक्यापैकी 265 तालुक्यात ट्रिगर 1 लागू
06:30
Video thumbnail
Sunetra Pawar|शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही – सुनेत्रा पवार
02:42
Video thumbnail
Latur|गुरुराज माऊलीच्या जयघोषात जळकोटमध्ये गणरायांना उत्साहात निरोप
00:48
Video thumbnail
Sunetra Pawar|दुष्काळाने शेतकरी हतबल; उपमुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
01:16
Video thumbnail
🔴 LIVE - ढोल-ताशांचा गजर, अन् बाप्पाचा जयघोष; लातूरमध्ये विसर्जन मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद
14:27
Video thumbnail
🔴 LIVE - ढोल-ताशांचा गजर, अन् बाप्पाचा जयघोष; लातूरमध्ये विसर्जन मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद
07:40
Video thumbnail
🔴 LIVE - ढोल-ताशांचा गजर, अन् बाप्पाचा जयघोष; लातूरमध्ये विसर्जन मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद
09:45
Video thumbnail
Nanded|मीनल पाटील आणि पती गजानन पाटील यांना नोटीस
01:16
Video thumbnail
Latur|शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गणेश विसर्जनाचा जल्लोष
01:49
Video thumbnail
Latur कुंडलीतील दोष दूर करण्याच्या नावाखाली अत्याचार;लातूरमध्ये धक्कादायक प्रकरण
07:21
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये गणेश विसर्जनासाठी मनपा सज्ज; १६ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र
03:54
Video thumbnail
Latur|गणेश विसर्जनासाठी मनपाची तयारी; झोन ‘ड’ मध्ये मूर्ती संकलन केंद्र
01:21

Latest news