नांदेड : प्रतिनिधी
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे उद्या सोमवार, दि. २८ सप्टेंबर रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. या दौ-यात ते दुष्काळग्रस्त भागातील पीक पाहणी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर कंधार तालुक्यातील शिराढोण येथे आयोजित महाआरोग्य शिबिरास उपस्थित राहणार आहेत.
महसूलमंत्री बावनकुळे हे दुपारी १२ वाजता हिंगोली येथून मोटारीने नांदेडकडे प्रयाण करतील. दुपारी २ वाजता नांदेड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील पीक पाहणी दौ-यास उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी ३ ते ४ या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीस उपस्थित राहतील. दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातून ते कंधार तालुक्यातील शिराढोण येथील कार्यक्रमस्थळाकडे प्रयाण करतील. दुपारी ४.३० वाजता प्रेरणास्थळ भीमाशंकर विद्यालय परिसर येथे आयोजित महाआरोग्य शिबिरास उपस्थित राहतील. सायंकाळी ५.४५ वाजता नांदेड विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर सायंकाळी ६.४५ वाजता विमानाने पुण्याकडे प्रयाण करतील.
















