22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमनोरंजनश्रद्धा कपूरचा मराठमोळा लुक सोशल मीडियावर व्हायरल

श्रद्धा कपूरचा मराठमोळा लुक सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : अभिनेत्री श्रद्धा कपूरने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने बॉलीवूडमध्ये मोठे यश संपादन केले. अभिनयासह तिच्या सौंदर्याचे देखील खूप चाहते आहेत. सध्या तिचा एक मराठमोळा लुक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. श्रद्धाने तिची वहिनी शाजा मोरानीच्या बेबी शॉवरला हजेरी लावली होती, जिथे ती हिरव्या पारंपारिक पोशाखात दिसली. या लुकमध्ये ती फारच सुंदर दिसत होती.

या कार्यक्रमात श्रद्धा कपूरच्या मराठी लूकने सर्वांचे लक्ष वेधलं आहे. यावेळी श्रद्धाचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळाला. श्रद्धाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. श्रद्धाने लिंबू कलरचा ड्रेस घातला होता. तसेच मॅचिंग कानातले आणि नाकात नथ घातली होती. तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून ज्यामध्ये श्रद्धा कपूर डान्स करताना दिसत आहे. सध्या तिच्या व्हिडिओवर लाइक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.

यापूर्वी देखील श्रद्धा कपूर मराठमोळ्या अंदाजात पाहायला मिळाली आहे. आता पुन्हा एकदा तिने हा लुक केल्याने तिचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. श्रद्धाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच राजकुमार रावसोबत ‘स्त्री २’ सिनेमात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता श्रद्धाचा आगामी सिनेमा पाहण्यासही चाहते उत्सुक आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR