मराठवाड्यात भीषण दुष्काळ : छत्रपती संभाजीनगरात काँग्रेसचा ‘जनआक्रोश दुष्काळ मोर्चा’

छत्रपती संभाजीनगर/लातूर (प्रतिनिधी)  
एल-निनोच्या तीव्र प्रभावामुळे यंदा मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने काही भागांत दुष्काळ जाहीर केला असला, तरी दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी कोणतीही ठोस मदत दिलेली नाही. सरकारच्या या शेतकरीविरोधी आणि उदासीन धोरणांविरोधात बुलंद आवाज उठवण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने बुधवार, दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता छत्रपती संभाजीनगर येथे ‘जनआक्रोश दुष्काळ मोर्चा’ काढण्यात येणार आहे. हा मोर्चा पैठण गेट ते विभागीय आयुक्त कार्यालय या मार्गाने निघणार आहे.

महाराष्ट्राचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी या संदर्भाने माहिती देताना सांगितले की, शासनाने पहिल्या टप्प्यात राज्यातील २६५ आणि नंतर १९ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला, परंतु प्रत्यक्षात कोणतीही मदत पोहोचलेली
नाही. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेचा आक्रोश शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हा ‘एल्गार’ पुकारण्यात आला आहे.

या भव्य जनआक्रोश मोर्चाचे नेतृत्व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रभारी डॉ. सिरीवेल्ला प्रसाद आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ करणार आहेत. तसेच, मोर्चाला काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री व काँग्रेस कार्य समिती सदस्य बाळासाहेब थोरात, माजी मंत्री आमदार अमित देशमुख, खासदार डॉ. कल्याण काळे, खासदार रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ. शिवाजी काळगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या मोर्चाच्या माध्यमातून शासनाकडे विविध मागण्या करण्यात येणार आहेत.

शासनाने केवळ दुष्काळ जाहीर करून न थांबता, शेतकरी आणि कष्टक-यांना तातडीने आर्थिक मदत देणे आवश्यक आहे. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता शासनाने भरीव मदत जाहीर करून त्यातील ५० टक्के रक्कम ताबडतोब शेतक-यांच्या बँक खात्यावर जमा करावी. दुष्काळी परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे फक्त परीक्षा शुल्क माफ करण्याच्या घोषणेवर न थांबता शासकीय व खाजगी शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करावे आणि दुष्काळी भागातून शहरात शिक्षणासाठी राहणा-या विद्यार्थ्यांना निवास व भोजन भत्ता जाहीर करण्यात यावा.

बहुतांश जिल्ह्यांत विमा कंपन्यांनी शेतक-यांची मागील वर्षातील नुकसान भरपाई अद्याप दिलेली नाही, ती तातडीने देण्यासाठी शासनाने विमा कंपन्यांनाही तसे निर्देश द्यावेत. यावर्षी दुष्काळामुळे खरिपाच्या पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले असल्याने विमा कंपन्यांनी शेतक-यांना सरसकट पूर्ण भरपाई देण्यासंदर्भात शासनाने आदेश द्यावेत. सद्यस्थितीत अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून तेथेतातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा. मराठवाड्यातील बहुतांश गावांत जल जीवन मिशनची कामे अर्धवट असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, ही सर्व कामे तातडीने पूर्ण करावीत.

चारा उपलब्ध नसल्यामुळे जनावरांच्या बाजारात मोठ्या प्रमाणात पशुधन विक्रीसाठी जात असून, हे पशुधन जतन करण्यासाठी लवकरात लवकर चारा छावण्या सुरू कराव्यात. तसेच दुष्काळग्रस्त भागातील शेतक-यांसोबतच इतर घटकांनाही आवश्यक ती मदत करून रोजगार हमी योजनेतून ठिकठिकाणी कामे सुरू करावीत आणि मागेल त्याला रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशा मागण्या या मोर्चाद्वारे केल्या जाणार आहेत. जोपर्यंत या सर्व मागण्या मंजूर होत नाहीत, तोपर्यंत काँग्रेस पक्ष लढा देत राहील.

काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह मराठवाड्यातील जनतेने मोठ्या प्रमाणात या मोर्चात सहभागी होण्यासाठी उद्या सकाळी छत्रपती संभाजीनगर येथील पैठण गेट येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

सुर्यकांत सरन्यायाधीशांच्या खुर्चीवर बसण्याच्या लायक नाहीत

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

अक्वान चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका

चंद्रपूर : बंगालच्या उपसागरात गेल्या महिनाभरात तयार झालेले अक्वान...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूर रेल्वे कोच कारखान्याची धीरज देशमुखांकडून पाहणी; रोजगार आणि वंदे भारत बोगींचा आढावा
06:39
Video thumbnail
Nanded|हदगावमध्ये बोगस डॉक्टरला अटक? आरोग्य विभागाची नागमाता दवाखान्यावर धाड
00:47
Video thumbnail
Latur|नांदगाव ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा आरोप; ग्रामस्थांचे उलटी हलगी वाजवून आंदोलन
10:08
Video thumbnail
Nanded|अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या कामावरून वाद; काँग्रेसचे आरोप, अशोक चव्हाणांचे प्रत्युत्तर
04:12
Video thumbnail
Nanded|हिमायतनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या सुविधांचा आढावा; अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबवर कारवाई होणार?
03:47
Video thumbnail
Latur|CBI चार्जशीटमध्ये नाव असलेल्यांनी खुलासा करावा; धिरज देशमुखांचा विरोधकांना सवाल
03:59
Video thumbnail
Latur|विलास सहकारी साखर कारखान्याचे वजनकाटे पारदर्शक? अचानक तपासणीत तफावत नसल्याचा दावा
03:38
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये श्वान निर्बीजीकरण कामाची चौकशी होणार; स्थायी समितीचा मोठा निर्णय
06:35
Video thumbnail
Latur|संविधान हा राष्ट्रीय ग्रंथ; संविधान दिन जनजागृतीतून साजरा करा – भंते पय्यानंद
03:19
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये संविधान दिन उत्साहात; संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन
02:17
Video thumbnail
Latur|आयुष्यमान भारत मिशनचा लातूर जिल्ह्यात आढावा; ५७ टक्के लाभार्थ्यांची कार्ड जनरेट
02:44
Video thumbnail
Beed|कपिलधार येथे मन्मथ स्वामींच्या दर्शनासाठी अलोट गर्दी; कार्तिक पौर्णिमेला हजारो भाविक दाखल
01:28
Video thumbnail
Sanjay Bansode|कृष्णा खोऱ्यातील 2 टीएमसी पाणी लातूरला द्या! संजय बनसोडेंची मागणी
03:50
Video thumbnail
Dhiraj Deshmukh|धिरज देशमुख जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी; निवडीनंतर जल्लोष आणि भव्य रॅली
02:07
Video thumbnail
Latur DCC Bank Election| बँकेच्या चेअरमनपदी पुन्हा धिरज देशमुख; उपाध्यक्षपदी अविनाश जाधव पाटील
06:17

Latest news