मोटार अपघात नुकसानभरपाई पोटी २ कोटी ९० लाख रुपये मंजूर

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा व सत्र न्यायालयात मोटार अपघात नुकसान भरपाईच्या दाव्यात ऐतिहासिक तडजोड झाली असून तब्बल २ कोटी ९० लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे टाटा ए. आय. जी. इन्शुरन्स कंपनीने मान्य केले आहे. लातूर जिल्हा न्यायालयाच्या इतिहासातील ही सर्वाधिक नुकसान भरपाईची रक्कम असल्याचे सांगण्यात आले. या निर्णयामुळे दिवंगत न्यायाधीशांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
काही काळापूर्वी  दिवंगत न्यायाधीश स्व. उद्धव पाटील यांचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांच्या कायदेशीर वारसांतर्फे नियमानुसार मोटार अपघात नुकसान भरपाईचा दावा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात प्रदीर्घ न्यायालयीन प्रक्रियेत न अडकता पीडित कुटुंबाला योग्य नुकसानभरपाई मिळावी या उद्देशाने सर्व संबंधितांनी सामोपचाराने तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले.
या प्रकरणात लातूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारुका, जिल्हा न्यायाधीश राहुल भागवत, जिल्हा न्यायाधीश सतीश पाटील आणि तदर्थ जिल्हा न्यायाधीश फैजुद्दीन शेख यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. लातूर जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवकुमार जाधव, उपाध्यक्ष अ‍ॅड. लहू चामे, सचिव अ‍ॅड. गुरुप्रसाद येरटे, सहसचिव अ‍ॅड. सिद्धेश्वर धायगुडे आणि अ‍ॅड. श्रद्धा पाटील यांनीही मध्यस्थीसाठी सहकार्य केले. तसेच विमा कंपनीचे विधी सल्लागार अ‍ॅड. सुरेशराव डुईजोडे यांनी या प्रक्रियेत सहभाग घेतला. दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या मुख्य दालनात आयोजित विशेष कार्यक्रमात दिवंगत न्यायाधीश स्व. उद्धव पाटील यांच्या कायदेशीर वारसांना २ कोटी ९० लाख रुपयांचा धनादेश प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारुका यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Illegal Moneylending Case | अवैध सावकारीविरोधात गुन्हा दाखल | Latur News | Ekmat Digital
01:52
Video thumbnail
Latur Railway Coach Factory | स्थानिक युवकांना रोजगार कधी? | Latur News | Ekmat Digital
03:12
Video thumbnail
माहूरजवळ भीषण अपघात | एकाचा मृत्यू, चार गंभीर जखमी | Nanded News Today
02:03
Video thumbnail
Latur|समान वेतनासाठी सेवानिवृत्त कर्मचारी आक्रम;कवेतनातील तफावत कधी मिटणार?
06:30
Video thumbnail
Nanded Sand Mafia Action | आठ बोटी ब्लास्ट करून नष्ट | LCB Raid | Nanded News
00:48
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये १४.४८ लाखांचा गुटखा जप्त | बोलेरोसह मुद्देमाल ताब्यात | Latur News
01:42
Video thumbnail
'गोविंदा' अन् 'उदो उदो'च्या जयघोषात अंबाबाईला तिरुपती देवस्थानचा मानाचा शालू अर्पण
00:56
Video thumbnail
Maharashtra Drought|५ हजारांत दुष्काळ मिटणार? शेतकऱ्यांची बोळवण? | मुद्दा महाराष्ट्राचा
47:58
Video thumbnail
Latur Traffic Police|आईच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांना वाहतूक शाखेचे सुरक्षा कवच!
02:17
Video thumbnail
५ हजार मदत म्हणजे क्रूर थट्टा; दुष्काळग्रस्तांना १ लाख रुपयांच्या मदतीची शेतकरी संघटनांची मागणी.
10:59
Video thumbnail
Parbhani|परभणीत न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन!
03:58
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये ५५ वर्षीय महिलेच्या खुनाचा उलगडा; २४ तासांत संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
02:49
Video thumbnail
DCC BANK ELECTION|पक्षीय राजकारण बाजूला! सहकारमंत्री बाबासाहेब पाटील धिरज देशमुखांसोबत
04:38
Video thumbnail
Nanded|कंधारमध्ये मध्यरात्री कार मन्याड नदीत कोसळली; महिलेचा दुर्दैवी मृत्यू
01:37
Video thumbnail
Nanded|माहूरच्या केरोळी घाटात भीषण अपघात! टेम्पो दरीत कोसळून दोघांचा मृत्यू, चार जण गंभीर
01:10

Latest news