कंत्राटदारांची ८६ हजार कोटींची देयके प्रलंबित

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील विविध शासकीय विभागांकडील कंत्राटदारांची सुमारे ८६ हजार कोटी रुपयांची देयके गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने केला आहे. या आर्थिक कोंडीमुळे कंत्राटदार अडचणीत सापडले असून, मागील अकरा महिन्यांत नऊ कंत्राटदारांनी आत्महत्या केल्याचा गंभीर मुद्दाही महासंघाने उपस्थित केला आहे.
कंत्राटदारांची प्रलंबित देयके, आर्थिक अडचणी आणि अन्य प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने उच्चस्तरीय समिती स्थापन करावी, अशी मागणी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांना निवेदन देऊन शासनाकडे तातडीने पाठपुरावा करण्याची मागणी केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग, जलजीवन मिशन, आदिवासी विकास विभाग, पर्यटन विभाग, ग्रामविकास विभाग आणि जलसंपदा विभागासह विविध शासकीय विभागांतील कंत्राटदारांची मोठ्या प्रमाणावर देयके प्रलंबित असल्याचे महासंघाने निवेदनात म्हटले आहे. गेल्या दोन वर्षांपासून देयके मिळत नसल्याने कंत्राटदारांवर आर्थिक ताण वाढला आहे. कामांसाठी घेतलेले कर्ज, साहित्य खरेदी, मजुरांचे वेतन आणि अन्य खर्च भागविताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

या प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, राज्य अभियंता संघटना आणि महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना यांनी विविध लोकशाही मार्गांनी आंदोलने केली आहेत. धरणे आंदोलन, मोर्चे आणि उपोषणांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करूनही प्रश्न सुटले नसल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.

नऊ कंत्राटदारांच्या आत्महत्यांचा मुद्दा ऐरणीवर
प्रलंबित देयके आणि आर्थिक अडचणींमुळे मागील अकरा महिन्यांत नऊ उद्योजक कंत्राटदारांनी आत्महत्या केल्याचा दावा महासंघाने केला आहे. या घटनांनंतरही संबंधित कुटुंबांना आर्थिक मदत, प्रलंबित देयकांबाबत ठोस निर्णय किंवा दिलासा देणारी आश्वासने मिळाली नसल्याची खंत संघटनेने व्यक्त केली आहे. विकासकामे करणा-या कंत्राटदारांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने संवेदनशीलतेने निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

विकासकामांना गती देण्यात कंत्राटदारांची महत्त्वाची भूमिका असते. मात्र, देयके दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यास विकासकामांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन कंत्राटदारांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी भूमिका प्रकाश पालेरचा यांनी मांडली.

उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची मागणी
कंत्राटदारांची प्रलंबित देयके तातडीने अदा करणे, त्यांच्या आर्थिक व व्यावसायिक अडचणी सोडविणे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने उच्चस्तरीय समिती स्थापन करून सर्व संबंधित विभागांच्या देयकांचा आढावा घ्यावा. कंत्राटदारांच्या प्रश्नांवर कालबद्ध निर्णय घेण्यासाठी शासन निर्णय जारी करण्याची शिफारस जिल्हा प्रशासनाने करावी, अशी मागणी महासंघाने केली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातुरात ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात | संजय बनसोडे यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण
02:22
Video thumbnail
Nanded|माहूरगडावर व्हीआयपी दर्शनामुळे वाहतूक कोंडी? संतप्त भाविकाने आमदाराच्या गाडीची काच फोडली
01:39
Video thumbnail
Latur|जळकोट पोस्ट ऑफिसमध्ये दिव्यांगांची हेळसांड; प्रशस्त जागेत स्थलांतर करण्याची मागणी
01:29
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये जुने शेतकरी भवन जमीनदोस्त | दीड कोटींच्या नवीन भवनाचे काम सुरू होणार
02:04
Video thumbnail
Nanded|नांदेडच्या बोरगावातील ४६ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या
03:38
Video thumbnail
Latur|लातूर महापालिकेचा मोठा निर्णय! कर भरला नाही तर थेट मालमत्तेचा लिलाव!
01:40
Video thumbnail
Latur Water Theft News|लातूर मांजरा जलवाहिनीवर मोठी कारवाई! ३४ अनधिकृत कनेक्शन तोडले
02:09
Video thumbnail
Latur News|लातूरमध्ये दांडिया रासमधून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत
01:53
Video thumbnail
Latur Crime News|लातूरमध्ये तरुणाला नग्न करून मारहाण! पेट्रोल टाकल्याचा आरोप; चौघांविरुद्ध गुन्हा
02:52
Video thumbnail
कैमेऱ्यात कैद झालेला सर्वात भीषण जीवघेणा हल्ला! टायगर श्रॉफ थोडक्यात वाचला; थरारक व्हिडिओ समोर
00:31
Video thumbnail
रस्त्यावर दारू पिऊन गोंधळ घालताय? पोलिसांचा बडगा बसणार! #breakingnews #digitalekmat #marathinews
01:05
Video thumbnail
Nilanga Congress Protest | शेतकरी मदत आणि SIR वरून काँग्रेस आक्रमक | Latur News | Ekmat Digital
06:45
Video thumbnail
Latur News | दुष्काळामुळे डाळ-तांदूळ महागले? ३०% दरवाढीचा दावा | Inflation News | Ekmat Digital
02:18
Video thumbnail
देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; अपघातात पाच जणाचा मृत्यू #breakingnews #digitalekmat
00:57
Video thumbnail
CRPF Jawans Dandiya Celebration | सीआरपीएफ जवानांचा दांडिया | Navratri Special | Ekmat Digital
01:35

Latest news