22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीयमोदींच्या कुटनीतीने पाकिस्तानचा उडाला होता थरकाप

मोदींच्या कुटनीतीने पाकिस्तानचा उडाला होता थरकाप

नवी दिल्ली : २०१९ च्या फेब्रुवारीत पंतप्रधान मोदींच्या कूटनितीने पाकिस्तानला घाम फोडला होता, असा दावा पाकिस्तानातील तत्कालीन भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांनी पुस्तकात केला आहे. पाकिस्तानातील तत्कालीन भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘अँगर मॅनेजमेंट’ या पुस्तकातून मोंदीची मुसद्देगिरी अधोरेखित केली आहे.

अजय बिसारिया २०१९ ची भारत पाकिस्तानमधली परिस्थिती वर्णन करताना आपल्या पुस्तकात म्हटले की, २०१९ च्या फेब्रुवारीत पंतप्रधान मोदींच्या कूटनितीने पाकिस्तानला घाम फोडला होता. भारतीय लष्कराने तब्बल नऊ क्षेपणास्त्रे पाकिस्तानवर सोडण्याची तयारी केली होती. भारताची ही युद्धसज्जता पाहून तत्कालीन पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान मोदींना फोन केला, पण मोदींनी हा फोन स्वीकारला नाही. त्यापूर्वी पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांच्या घरीही पाकिस्तानी अधिकारी पोहोचले होते. ही रात्र २७ फेब्रुवारी २०१९ ची होती. हा तोच दिवस आहे जेव्हा भारतीय ंिवग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानच्या ताब्यात होते. हा घटनाक्रम पाकिस्तानातील तत्कालीन भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांनी त्यांच्या अँगर मॅनेजमेंट या पुस्तकात शब्दबद्ध केला भारताच्या या आक्रमक कूटनितीने आणि कोणत्याही क्षणी हल्ला करण्याच्या शक्यतेने पाकिस्तान त्यांच्या दहशतवाद्यांना आश्रय देण्याच्या भूमिकेचाही फेरविचार करायला तयार झाले होते, असाही दावा बिसारिया यांच्या पुस्तकात करण्यात आला. भारताच्या या तयारीमुळे, पाकिस्तानला दोनच दिवसात ंिवग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका करावी लागली. पंतप्रधान मोदींनी या २७ फेब्रुवारीच्या या रात्रीचा उल्लेख कत्ल की रात असा केल्याचा दावाही अजय बिसारिया यांच्या पुस्तकातून करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR