लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरात दिवसेंदिवस ब्रँडेड शोरूमची संख्या वाढत आहे. तसेच शहराचा झापाट्याने विकास होत असल्यामुळे नवीन कलाकारांचा ओढा लातूर शहरात वाढला आहे. अशीच एक नवीन संकल्पना घेऊन लातूर शहरात सेलीबे्रटी मेकअप आर्टिस्ट लखन परळीकर या तरुण कलाकाराने लखन मेकअप नावाने मेकअपच्या दुनियेतील नवा ब्रँड लातूर शहरात लॉन्च केला आहे. या लखन मेकअप सलूनचे शानदार उद्घाटन विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते दि. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी झाले.
या उद्घाटन समारंभास लातूच्या महापौर जयश्री सोनकांबळे, परळीचे नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी, अॅड. जयश्री पाटील, संगीता मोळवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी लखन परळीकर या तरुणाने निर्माण केलेले पार्लर आणि स्पा सेंटरची सर्व सोयींनीयुक्त माहिती श्रीमती वैशालीताई देशमुख यांना दिली. यावेळी श्रीमती वैशालीताई देशमुख यांनी लखन परळीकर या तरुणाला व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या तर महापौर जयश्री सोनकांबळे यांनीदेखील या नव्या व्यवसायाला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. लखन परळीकर या तरुणाने या नावीन्यपूर्ण उपक्रमाची माहिती पाहुण्यांना दिली. प्रारंभी लखन परळीकर व प्रिया भद्रे यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
















