धाराशिव जिल्ह्यात ३० टक्के ऊस क्षेत्र चा-यासाठी राखीव

७० टक्के क्षेत्रावरील ऊसतोडणी मजुरांमार्फत करण्याचे जिल्हाधिका-यांचे आदेश
धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चारा उपलब्ध व्हावा, तसेच स्थानिक ऊसतोड मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. यंदाच्या गाळप हंगामात जिल्ह्यातील सर्व सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी एकूण ऊसतोडणीपैकी किमान ६० ते ७० टक्के ऊसतोडणी मजुरांमार्फत करावी. तसेच एकूण ऊस क्षेत्रांपैकी ३० टक्के ऊस चा-यासाठी राखीव ठेवावा, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत.

प्रत्येक साखर कारखान्याने उत्पादित बगॅस आणि मळी यांपैकी प्रत्येकी ३० टक्के साठा दुष्काळ निवारण, पशुधनासाठी चारा व पशुखाद्य निर्मिती यांसाठी राखीव ठेवणे आवश्यक आहे. या आदेशांमुळे चारा उपलब्धतेचे नियोजन करण्यासोबतच ग्रामीण भागातील मजुरांचे संभाव्य स्थलांतर रोखण्यास मदत होणार आहे. साखर कारखान्यांनी हार्वेस्टर यंत्राद्वारे ऊसतोडणी करताना उसाचा हिरवा पाला (वाढे) याचा चा-यासाठी अपेक्षित उपयोग होण्यात अडचणी येऊ शकतात. दुसरीकडे मजुरांमार्फत ऊसतोडणी केल्यास पशुधनासाठी वाढ्याची उपलब्धता वाढण्यास मदत होते. तसेच स्थानिक ऊसतोड मजुरांना रोजगार मिळतो. त्यामुळे आगामी गाळप हंगामात किमान ६० ते ७० टक्के ऊसतोडणी मजुरांमार्फत करावी आणि हार्वेस्टरचा वापर मर्यादित ठेवावा, असे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील एकूण ऊस लागवडीखालील क्षेत्रांपैकी ३० टक्के ऊस जनावरांच्या चा-यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच शक्यतो उसाच्या वाढ्याची साठवणूक कारखानास्तरावर करून दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चारा उपलब्ध होईल, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. जिल्ह्यातील संभाव्य चारा छावण्या, पूरक चारा निर्मिती आणि पशुधनासाठी आवश्यक चारा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रत्येक साखर कारखान्याने आपल्या एकूण बगॅस उत्पादनापैकी ३० टक्के साठा राखीव ठेवावा. जिल्हा प्रशासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय हा राखीव साठा बाहेर विक्रीसाठी किंवा अन्य कामांसाठी वापरता येणार नाही, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

मळीचा ३० टक्के
साठा राखीव ठेवा
दुष्काळ निवारण, पशुखाद्य निर्मिती आणि सुक्या चा-यावर आवश्यक प्रक्रिया करण्यासाठी प्रत्येक साखर कारखान्याने उत्पादित मळीपैकी ३० टक्के साठा राखीव ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे पशुधनासाठी पूरक खाद्य उपलब्ध करण्याच्या नियोजनाला मदत होणार आहे.
—
कारखान्यांना साप्ताहिक
अहवाल बंधनकारक
जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी या निर्देशाची काटेकोर अंमलबजावणी करावी. केलेल्या कार्यवाहीचा साप्ताहिक अहवाल जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त आणि विशेष लेखा परीक्षक, वर्ग-१, सहकारी संस्था (साखर), धाराशिव यांच्याकडे सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या आदेशांचे उल्लंघन करणा-या साखर कारखान्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ तसेच इतर लागू कायदेशीर तरतुदींनुसार कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात एक लाख
७३ हजार हेक्टर ऊस क्षेत्र
धाराशिव जिल्ह्यातील १४ सहकारी व खाजगी साखर कारखान्यांकडे नोंद झालेले उसाचे क्षेत्र एक लाख ७३ हजार १९० हेक्टर आहे. यापैकी एक लाख तीन हजार ५८१ हेक्टर ऊस मजुरांमार्फत तोडला जाणार असल्याचे प्रस्तावित आहे. तसेच ६९ हजार ६०९ हेक्टर ऊसाचे क्षेत्र हार्वेस्टर यंत्राने तोडले जाणार आहे. जिल्हाधिका-यांच्या निर्देशाचे काटेकोर पालन झाल्यास जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध होणार आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Crime News|लातूर–जहीराबाद महामार्गावर खळबळ! पोत्यात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह
01:26
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये HomeLane च्या पहिल्या Experience Centre चं उद्घाटन | AI Home Interiors
08:24
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये पदवीधर मतदारसंघासाठी ६२% मतदान | ४१ उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत
01:36
Video thumbnail
Nanded News|नांदेडमध्ये चारा तस्करी उघड! दोन ट्रक जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
04:55
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये ‘लखन मेकअप’चं शानदार उद्घाटन | वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ
02:50
Video thumbnail
Latur Graduate Constituency Election | दुपारी १२ पर्यंत १९.३३% मतदान | Latur News
06:48
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये जबरदस्ती कर्जवसुलीविरोधात भीम आर्मी आक्रमक
03:39
Video thumbnail
Latur|आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात उदगीरमध्ये २५ तारखेला एल्गार आंदोलन
03:05
Video thumbnail
Latur News|लातूरमध्ये घरेलू महिला कामगारांचा एल्गार! विविध मागण्यांसाठी गांधी चौकात धरणे आंदोलन
06:46
Video thumbnail
Latur News|दुष्काळात हसेगावच्या सेवालायाचा पुढाकार! १०० गायींच्या संगोपनासाठी गो-सेवालय
07:47
Video thumbnail
लातूरच्या बाभळगावातील दसरा मेळावा LIVE
00:00
Video thumbnail
Parbhani News|ताडकळसमध्ये हरणाच्या पाडसावर कुत्र्यांचा हल्ला; शेतकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मदत
01:18
Video thumbnail
Nanded News|आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला रोहित पवारांचा आधार
05:38
Video thumbnail
Latur News|निलंगेकर बंधूंवर अभय साळुंके यांचा गंभीर आरोप! विक्टोरिया कंपनी प्रकरणाची कागदपत्रे सादर
03:36
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये अजय देहाडे यांच्या भीमगीतांची मेजवानी! भीमसैनिकांचा उत्साह शिगेला
08:44

Latest news