दुष्काळाची परिस्थिती गंभीर,  शासन फक्त घोषणांत व्यस्त

* संवेदनाहीन सरकारला आम्ही स्वस्थ बसू देणार नाही, माजी मंत्री आमदार अमित देशमुख
-काँग्रेस आणि विरोधी पक्ष मिळून जनतेला दिलासा मिळवून देऊ
लातूर : प्रतिनिधी 
मराठवाडा आणि महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती गंभीर असताना ‘पाणी कमी पडू देणार नाही, चारा कमी पडू देणार नाही’, अशा घोषणा करण्यातच राज्यातील सत्ताधारी व्यस्त आहेत. प्रत्यक्षात मात्र त्यांच्याकडून कोणत्याच प्रकारचे ठोस नियोजन आणि उपाययोजना करण्यात येत असल्याचे दिसत नाही. आता या मंडळीकडून दिवाळीला शिधा वाटपाचा देखावा केला जाईल; मात्र त्याने दुष्काळग्रस्तांच्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक होणार नाही, याची सरकारने जाणीव ठेवणे गरजेचे असल्याचे सांगून फक्त घोषणा करण्यात व्यस्त असलेल्या या सरकारला आम्ही स्वस्थ बसू देणार नाही, जनतेला दिलासा मिळवून देण्यासाठी काँग्रेस आणि विरोधी पक्ष मिळून दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा मिळवून देऊ, असे माजी, मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
लातूर येथे नियोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले, विरोधी पक्ष म्हणून आम्ही दुष्काळाचे राजकारण करणार नाही, मात्र सरकारने जनतेच्या मदतीसाठी पुढे येऊन  ठोस पावले उचलणे गरजेचे आहे, तसे झाले नाही तर मात्र जनतेला न्याय व मदत मिळवून देण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, मराठवाडा वॉटर ग्रीड, नदीजोड प्रकल्प, मराठवाड्याच्या हक्काचे २१ टीएमसी पाणी आणि कृष्णा खो-यातील अतिरिक्त पाणी मराठवाड्यात आणण्याबाबत केवळ चर्चा आणि आश्वासने दिली जातात. महाराष्ट्र जलसंपदा विभागाचेही या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांबाबत ठोस निर्णय घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची गरज आहे. दुसरीकडे पावसाळ्यात मराठवाड्यातील नद्यांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जाते. तलाव व धरणांमधील गळती, बॅरेज आणि बंधा-यांच्या दुरुस्तीकडे होणारे दुर्लक्ष तसेच कंत्राटदारांची थकीत बिले यामुळे जलसंधारणाची कामे रखडत आहेत आणि पाण्याचा अपव्यय होत आहे.
मराठवाड्याला दरवर्षी आश्वासनांचे गाजर दाखवण्याऐवजी कायमस्वरूपी जलसुरक्षेची हमी देणा-या ठोस उपाययोजना हव्यात. सरकारने चर्चांचे आणि आश्वासनांचे राजकारण थांबवून दूरगामी परिणाम करणा-या प्रकल्पांना गती द्यावी आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे सांगतानाच पाण्याच्या प्रश्नावर सरकारची अकार्यक्षमता आता मराठवाड्याच्या जनतेच्या  भवितव्याशी खेळणारी ठरत असल्याचेही त्यांनी म्हटले.
लातूर, धाराशिव, बीडसाठी 
दीर्घकालीन ठोस योजना हवी
मराठवाड्यातील लातूर, धाराशिव आणि बीड हे तीन जिल्हे पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतात. निसर्गचक्रामुळे दर दहा वर्षांनी या भागात आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे केंद्र शासनाने विशेष लक्ष देऊन या भागासाठी कायमस्वरूपी जलव्यवस्थापनाच्या उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे माजी, मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी सांगितले.
लातूर शहरात पाणीपुरवठ्याचे 
काटेकोर नियोजन आवश्यक
लातूर शहराला पाणीपुरवठा करणा-या मांजरा धरणातील उपलब्ध ८ टक्के जिवंत पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन आणि काटकसरीने वापर केल्यास जूनपर्यंत पाणीपुरवठा करणे शक्य आहे. यासाठी व्यापक जनजागृती, पाण्याचा अपव्यय टाळणे आणि पाणीपुरवठ्याचे रेशनिंग करणे आवश्यक आहे. नागरिकांनी समजूतदारपणा आणि सहकार्य दाखविल्यास या संकटावर मात करता येईल, असेही माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी म्हटले.
लातूर महानगरपालिका प्रशासनही जागृत आहे, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी उपाययोजना सुरू केल्या आहेत. अनधिकृत नळजोडण्या शोधून त्या बंद करणे आणि पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. या अभूतपूर्व संकटाचा सामना करण्यासाठी महानगरपालिकेने शासनाकडे मदतीचे प्रस्ताव पाठविले आहेत. या गंभीर जलसंकटावर मात करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने आवश्यक ती मदत करणे गरजेचे आहे. शासनाने तातडीने सहकार्य करावे, यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
जिल्हा बँकेत बहुतांश जागा जिंकून
दोन तृतीयांशपेक्षा अधिक बहुमत मिळवू 
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ही सहकार क्षेत्रातील निवडणूक आहे. सहकाराची तत्त्वे आणि मूल्ये जपणारे सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख आणि राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी गेल्या अनेक दशकांपासून एकत्रितपणे सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत बाबासाहेब पाटील आमच्या सोबत आले म्हणून त्यांच्यावर टीका करणे अनाठायी आहे. सहकारातून समृद्धी आणि सर्वसामान्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याचे काम माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्हा बँकेने केले आहे. या कामगिरीच्या बळावरच माजी आमदार तथा बँकेचे विद्यमान अध्यक्ष धिरज देशमुख बिनविरोध निवडून आले. बँकेने जपलेली सहकाराची परंपरा, पारदर्शक कारभार आणि सर्वसामान्यांशी जोडलेली नाळ यामुळे उर्वरित जागांवरही आमच्या पॅनलला असाच प्रतिसाद मिळेल. या निवडणुकीत बहुतांश जागा जिंकून दोन-तृतीयांशपेक्षा अधिक जागांवर विजय मिळवू, असा ठाम विश्वास माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Crime News|लातूर–जहीराबाद महामार्गावर खळबळ! पोत्यात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह
01:26
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये HomeLane च्या पहिल्या Experience Centre चं उद्घाटन | AI Home Interiors
08:24
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये पदवीधर मतदारसंघासाठी ६२% मतदान | ४१ उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत
01:36
Video thumbnail
Nanded News|नांदेडमध्ये चारा तस्करी उघड! दोन ट्रक जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
04:55
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये ‘लखन मेकअप’चं शानदार उद्घाटन | वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ
02:50
Video thumbnail
Latur Graduate Constituency Election | दुपारी १२ पर्यंत १९.३३% मतदान | Latur News
06:48
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये जबरदस्ती कर्जवसुलीविरोधात भीम आर्मी आक्रमक
03:39
Video thumbnail
Latur|आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात उदगीरमध्ये २५ तारखेला एल्गार आंदोलन
03:05
Video thumbnail
Latur News|लातूरमध्ये घरेलू महिला कामगारांचा एल्गार! विविध मागण्यांसाठी गांधी चौकात धरणे आंदोलन
06:46
Video thumbnail
Latur News|दुष्काळात हसेगावच्या सेवालायाचा पुढाकार! १०० गायींच्या संगोपनासाठी गो-सेवालय
07:47
Video thumbnail
लातूरच्या बाभळगावातील दसरा मेळावा LIVE
00:00
Video thumbnail
Parbhani News|ताडकळसमध्ये हरणाच्या पाडसावर कुत्र्यांचा हल्ला; शेतकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मदत
01:18
Video thumbnail
Nanded News|आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला रोहित पवारांचा आधार
05:38
Video thumbnail
Latur News|निलंगेकर बंधूंवर अभय साळुंके यांचा गंभीर आरोप! विक्टोरिया कंपनी प्रकरणाची कागदपत्रे सादर
03:36
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये अजय देहाडे यांच्या भीमगीतांची मेजवानी! भीमसैनिकांचा उत्साह शिगेला
08:44

Latest news