तेहरान : वृत्तसंस्था
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध थांबवण्याबाबतच्या वाटाघाटींची प्राथमिक फ्रेमवर्क तयार झाली आहे. त्यानुसार इराणने त्यांचे समृद्द युरेनियम तिस-या देशात ठेवण्याचा प्रस्ताव असून होर्मुझ देखील सात दिवसात खुलं करण्याबाबत प्राथमिक सहमती झाली आहे. याबाबतचे वृत्त अल अरेबियाच्या इंग्रजी वृत्तात देण्यात आली आहे.
या प्राथमिक ड्राफ्ट फ्रेमवर्क या न्यूज प्लॅटफॉर्मकडेच आहे. त्यात दावा केल्यानुसार या कराराची शाश्वतता आणि त्याची अंमलबजावणी होण्यासाठी चीन संभाव्य गॅरेंटर आहे. या प्रस्तावानुसार अमेरिका आणि तेहरान यांच्यात इस्तांबुल ऐवजी दोहा येथे थेट वाटाघाटी करण्यात येणार आहेत.
प्रस्तावित करारानुसार इराण आपल्या न्युक्लिअर प्रोग्राम आणि समुद्री दळणवळणाच्या सुरक्षेबाबतची जबाबदारी घेणार आहे. त्याच्या बदल्यात अमेरिकेने इराणवर लावलेले निर्बंध हटवावेत तसेच जो ब्लॉकेड लावला आहे आणि आर्थिक बंधने घातली आहेत ती देखील कमी करावीत अशा तरतूदी आहेत.
या फ्रेमवर्कमध्ये या अटी शर्तींचे पालन होत आहे का नाही याची स्वतंत्ररित्या खात्री करून घेण्याची व्यवस्था देखील निर्माण करण्यात यावी. ही पडताळणी व्यवस्था कराराच्या अंमलबजावणीच्या प्रत्येक टप्प्यावर मुल्यपामन करेल. यात एकमेकांना कळवल्याशिवाय कोणताही बदल करता येणार नाही.
या स्वतंत्र वाद निवारण व्यवस्थेत मध्यस्थ आणि गॅरेंटर देशांचा देखील समावेश असेल. हे देश देखील होणारा विलंब आणि कराराचे उल्लंघन होत असेल तर त्यावर कार्यवाही करून नवा वाद किंवा लष्करी संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करेल.
होर्मुझमध्ये जहाजावर चुंबक बॉम्बने हल्ला
इराण आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या संघर्षात वादाचं केंद्र ठरलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत आता माहवाहू जहाजांवर होत असलेल्या हल्ल्यांचा धोका अधिकच वाढला आहे. यादरम्यान शुक्रवारी ३० ऑक्टोबर रोजी भारतीय नाविक असलेल्या पनामाचा झेंडा लावलेल्या तेलवाहू जहाजावर चुंबक बॉम्बद्वारे हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात झालेल्या स्फोटामुळे जहाजाच्या इंजिन रुममध्ये आग लागली. त्यामुळे हे तेलवाहू जहार काही काळ बंद पडले. सुदैवाने या हल्ल्यानंतर जहाजावर असलेले २७ भारतीय कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.
















