जिल्हा बँक नफ्यात चालवून १,७८० कोटींचे केले पीककर्ज वाटप 

आमचं दृश्यम् नव्हे तर शुद्ध रामायण, पत्रकार परिषदेत धिरज देशमुख यांचे विरोधकांना आकडेवारीतून उत्तर 
लातूर : प्रतिनिधी 
सन १९८४ मध्ये सुरू झालेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रगतीचा प्रवास बँकेचे विद्यमान चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांसमोर मांडला. सलग ४ वर्षे बँकेचा वार्षिक ढोबळ नफा १०० कोटींहून अधिक राहिला असून बँकेने १,७८० कोटींचे पीककर्ज वाटप केले. जिल्ह्यातील एकूण पीककर्ज वाटपात एकट्या जिल्हा बँकेचा सुमारे ६० टक्क्यांपेक्षा जास्त वाटा असल्याचे ते म्हणाले. आमचं दृश्यम् नव्हे तर शुद्ध रामायण आहे, असे नमूद करून धिरज देशमुख यांनी विरोधक सहकाराची, बँकेची कसलीही माहिती न घेता, कसलाही अभ्यास न करता बेछूट टीका करीत असल्याचे म्हटले.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘सहकार पॅनल’च्या वतीने शहरातील जुन्या एमआयडीसीतील हॉटेल भारत फाईनडाईनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेस बँकेचे विद्यमान चेअरमन धिरज विलासराव देशमुख, ‘सहकार पॅनल’चे उमेदवार हेमंत जाधव, सौ. संगीता अशोक पाटील निलंगेकर, प्रकाश पाटील बाकलीकर, दिलीप पाटील नागराळकर, प्रिती भोसले, आशिष पाटील, संतोष पाटील, जयेश माने, अशोक गोविंदपूरकर, जगन्नाथ पाटील, चंद्रशेखर दंडिमे, शेषेराव हाके, सौ. शीतल कल्याण पाटील, गितांजली लांडगे, सर्जेराव मोरे, विवेक सिरसाट, अविनाश जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भक्कम वाटचालीला लोकनेते विलासराव देशमुख यांची विकासदृष्टी आणि सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे सहकारातील दूरदर्शी नेतृत्व लाभले, असे नमूद  करून धिरज विलासराव देशमुख पुढे म्हणाले की, गेल्या ५ वर्षांत विद्यमान संचालक मंडळाने अतिशय पारदर्शकपणे बँकेचे कामकाज केले. माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘सहकार पॅनल’ ताकदीने निवडणुकीत उतरले आहे. लोकनेते विलासराव देशमुख, माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचा विकासाचा वारसा घेऊन ‘सहकार पॅनल’ ‘शिट्टी’ या चिन्हावर निवडणूक लढत आहे.
बँकेच्या स्थापनेपासूनच्या ३८ वर्षांतील एकूण नफ्यापेक्षा २०७ कोटींचा अधिक निव्वळ नफा गेल्या ५ वर्षांत मिळवला. गेल्या ५ वर्षांत बँकेने राज्य व राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळवले. पारदर्शक नोकर भरतीतून लातूर जिल्ह्यातील २६३ भूमिपुत्रांना बँकेत नोकरी उपलब्ध करून दिली. नोकर भरतीत ७० टक्के जागांवर स्थानिकांना संधी दिली.
कर्ज वितरणाला मोठी गती
जिल्हा बँकेने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून १३,४४९ सभासदांना रु. ४७.७८ कोटी कर्जमाफी; नियमित कर्जफेड करणा-या १,०१,९५९ सभासदांना रु. १३९.२२ कोटी प्रोत्साहन अनुदान, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून २३,३५७ सभासदांना रु. ७२.८७ कोटी कर्जमाफी; १,१५,९५५ सभासदांना रु. ३५५.२२ कोटी प्रोत्साहन अनुदान दिले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदानासाठी विशेष व्यवस्था करून एकही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहू नये, यासाठी बँकेकडून नियोजनबद्ध कार्यवाही केली. ४४,५६६ थकबाकीदार शेतकरी सभासदांचे रु. ३२८.९४ कोटींची माहिती शासनाच्या कर्जमाफी पोर्टलवर अपलोड आहे. त्यापैकी २७,५५० शेतकरी सभासदांसाठी रु. १८१.१७ कोटी बँकेस प्राप्त. प्रोत्साहन अनुदान योजनेंतर्गत १,९३,१५७ शेतकरी सभासदांसाठी अंदाजे रु. ८१९.६४ कोटी प्राप्त होणे अपेक्षित. वरीलप्रमाणे लाभ अपेक्षित असला तरी शासनाच्या पात्रता व अपात्रतेसंबंधीच्या अटी व निकषांनुसार मिळणा-या रकमेत घट होऊ शकते. शेतक-यांना लवकर लाभ मिळावा यासाठी सहकार मंत्री महोदयांकडे पाठपुरावा सुरू आहे.
वैयक्तिक कर्ज योजनेतून १३७४० सभासदांना रु. ३७९.५८ कोटी; विद्यमान संचालक मंडळाच्या काळात १,४६६ सभासदांना रु. १४१.९६ कोटी कर्जवाटप करण्यात आले. गृहकर्ज मर्यादा रु. ३० लाखांवरून रु. ६० लाखांपर्यंत करून आजतागायत ५४३ सभासदांना रु. ५० कोटी, त्यापैकी विद्यमान कार्यकाळात ४३ सभासदांना रु. ११ कोटी वाटप केले. पेन्शन कर्ज योजनेतून निवृत्त कर्मचा-यांसाठी वयोमर्यादा, परतफेड कालावधी व कर्जमर्यादा वाढवून अल्प व्याजदरात कर्ज; आजतागायत ५०६७ सभासदांना रु. ७४.२४ कोटी, त्यापैकी विद्यमान कार्यकाळात १०३३ सभासदांना रु. ३४.५० कोटी वाटप केले. मुदतीत कर्जफेड न करू शकलेल्या शेतक-यांसाठी पीक कर्जाच्या व्याजात ५ टक्के सूट देत कर्जवसुली केवळ ६ टक्के दराने केली. जिल्ह्यातील एकूण ७,३६८ शेतक-यांनी या योजनेचा लाभ घेतला असून रु. ६९ लाख २४ हजार रकमेची व्याजात सूट दिली.
शेती, स्वयंरोजगार आणि
ग्रामीण समृद्धीला चालना
कृषी यांत्रिकीकरण योजनेतून हार्वेस्टरसाठी १३३ शेतकरी व १४३ साखर कारखान्यांना कर्जपुरवठा करण्यात आला. हार्वेस्टरमुळे सुमारे ४ ते ४.५  हजार लोकांना रोजगार मिळाला. एका हार्वेस्टरमधून एका हंगामात सुमारे ५० ते ६० लाख व्यवसायाची क्षमता आहे. ट्रॅक्टर-ट्रेलर योजना अधिक व्यापकपणे राबवण्यात आली. ट्रॅक्टर हेडसोबत ट्रेलर व शेती औजारांसाठीही कर्ज. पाच वर्षांत ३६७ सभासदांना रु.३२.३७ कोटीचे वाटप करण्यात आले. रेशीम उद्योग कर्ज योजनेतून तुती व रेशीम उद्योगासाठी कर्जमर्यादा रु. २ लाखांवरून रु. ३.२५ लाख, तीही शून्य टक्के व्याजदराने. आजतागायत १५९ सभासदांना रु. २.९४ कोटी; विद्यमान संचालक मंडळाच्या कार्यकाळात ६९ सभासदांना रु. १.५८ कोटी; जवळपास ६३ हेक्टर क्षेत्र रेशीम शेती अंतर्गत आले आहे. ड्रॅगन फ्रूट योजनेला चालना देण्यात आली. पूरक शेती व्यवसायाला प्रोत्साहन; ४ सभासदांना रु. १३ लाखांचे कर्ज; ४ हेक्टर क्षेत्र ड्रॅगन फ्रूट अंतर्गत आले. कृषी पायाभूत सुविधा गोदाम, दुकानगाळे व संस्थांच्या सक्षमीकरणासाठी १७ संस्थांना रु. ४.६० कोटी कर्जवाटप करण्यात आले.  शेतीसोबत यांत्रिकीकरण, रेशीम उद्योग, फळपिके, पायाभूत सुविधा आणि स्वयंरोजगाराला आर्थिक पाठबळ देत ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला.
सामाजिक सुरक्षा, कुटुंबाला
आधार आणि जनकल्याण
माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी शुभमंगल कर्ज योजना २००७ पासून सुरू केली. या योजनेतून ३,६५८ शेतक-यांच्या मुलींच्या लग्नासाठी रु. २४.८९ कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले.  पाच वर्षांत याच योजनेतून २२१ सभासदांना रु. ४.७४ कोटी कर्ज वितरण करण्यात आले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना रु. ४५ लाखांपर्यंत स्वनिधीतून अपघाती विमाकवच देण्यात आले. सरकारी डीबीटी अनुदानासाठी ६,४०,५४० ग्राहकांची खाती बँकेशी जोडलेली आहेत. बँकेने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत झिरो बॅलेन्सने खाते उघडले. योजनेच्या सुरूवातीस ६३८६२ महिला भगिनींना योजनेचा लाभ मिळाला तर सप्टेंबर अखेर ४६४६१ महिलांना रक्कम प्राप्त होत आहे. निराधार योजनेतील लाभार्थ्यांना जिल्हा बँक आपल्या दारी या संकल्पनेतून शाखा नसलेल्या ४३५ गावांत ८ एटीएम व्हॅनव्दारे गावोगावी जाऊन बँकिंग सुविधा; यासाठी बँकेस प्रतिमाह रु. १०.६१ लाख खर्च होत आहे.
नोकर भरतीत स्थानिकांसह
राज्यभरातील युवकांना संधी
लातूर जिल्हा बँकेच्या सरळसेवा भरतीत एकूण ३७५ पदांची भरती प्रक्रिया पूर्ण केली. त्यापैकी लातूर जिल्ह्यातील २६३ उमेदवारांची नियुक्ती तर परजिल्ह्यातील ११२ उमेदवारांची नियुक्ती दिली. बँकिंग सेवा, पायाभूत सुविधा आणि संस्थांचे सक्षमीकरण ‘बँक तिथे इमारत’ उपक्रमातून गूळ मार्केट, सताळा, शिवणी कोतल, एकुरगा, औसा मार्केट, पोमादेवी जवळगा, लामजना व किल्लारी येथे नवीन इमारती उभ्या केल्या. हडोळती, सावरगाव लातूर, पानगाव, कारेपूर, शिरूर ताजबंद व वांजरवाडा शाखांसाठी नवीन इमारतींच्या बांधकामास सुरुवात केली आहे.
विविध कार्यकारी व बिगरशेती संस्थांना स्वमालकीच्या इमारतीसाठी कर्ज व प्रोत्साहन म्हणून संस्थांना आजपर्यंत रु. १०० कोटींपेक्षा अधिक लाभांश, त्यापैकी पाच वर्षांत रु. ४७ कोटींचे वाटप करण्यात आले. मोबाईल बँकिंग, यूपीआय, टॅप अ‍ॅन्ड गो एटीएम कार्ड, मीसकॉल अलर्ट, अशा डिजिटल सुविधा दिल्या.
स्पर्धात्मक बँकिंगमध्ये
मजबूत आर्थिक कामगिरी
ठेवींवर अधिक आणि कर्जावर कमी व्याजदराचे ग्राहकाभिमुख धोरण अवलंबिले. बिनव्याजी कर्ज व व्याज सवलतीचा भार बँकेकडून उचलूनही सलग ४ वर्षे दरवर्षी रु. १०० कोटींपेक्षा अधिक ढोबळ नफा मिळवला. स्थापनेपासून ३८ वर्षांतील एकूण निव्वळ नफा रु. २०७ कोटी, तर मागील पाच वर्षांतच रु. २४९ कोटी आहे. पाच वर्षांत रु. ९२.७१ कोटी आयकर भरला. आर्थिक शिस्त, नियोजन व सक्षम व्यवस्थापनातून बँकेची आर्थिक स्थिती अधिक मजबूत केली.
गुंतवणूक आणि पुरस्कार
मागील ५ वर्षांत गुंतवणुकीतून रु. ४५७ कोटींचा परतावा केला. प्रभावी गुंतवणुकीसाठी स्वतंत्र गुंतवणूक विभागाची स्थापना केली. पाच वर्षांत उल्लेखनीय कामगिरीबद्दल सुमारे १३ पुरस्कार मिळाले. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनकडून वैकुंठभाई मेहता पुरस्कारासह ३ पुरस्कार प्राप्त झाले. नाबार्डमार्फत १ आणि बँकोमार्फत ३ असे एकूण ४ पुरस्कार उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनासाठी मिळाले आहेत, असे धिरज विलासराव देशमुख म्हणाले.
सलग ४ वर्षे ढोबळ नफा
रु. १०० कोटींपेक्षा अधिक
-चॉकी सेंटर, ट्रेलर, कंबाईन हार्वेस्टर, ड्रॅगन फ्रूट अशा नवीन ४ कर्ज योजना सुरू.
-कर्जमर्यादा रु. ३ लाखांवरून रु. ५ लाखांपर्यंत. या अंतर्गत ३७४२ शेतकरी सभासदांना रु. १४८.९४ कोटींचे कर्ज वाटप केले.
-पीक कर्जात रु. ८३० कोटींची वाढ करून एकूण रु. १,७८० कोटींचे कर्जवाटप केले.
-जवळपास ४५ हजार नवीन कर्जदार सभासद जोडले.
-जिल्ह्यातील एकूण वाटपापैकी सुमारे ६० टक्के वाटा जिल्हा बँकेचा आहे.
-लोकनेते विलासराव देशमुख व्याज सवलत योजनेतून ८,७०३३  शेतक-यांच्या कर्जावरील रु. १३.७४ कोटी व्याज बँकेने स्वनिधीतून भरले.
-शेतकरी सभासदांना लाभ देत सलग ४ वर्षे बँकेचा वार्षिक ढोबळ नफा रु. १०० कोटींपेक्षा अधिक असल्याचे चेअरमन धिरज देशमुख म्हणाले.
उच्चशिक्षण, महिला सक्षमीकरण आणि आर्थिक आधार
शेतक-यांच्या पाल्यांच्या उच्चशिक्षणासाठी व्याजदरात कपात व कर्जमर्यादेत वाढ करण्यात आली. ३६ विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षणासाठी कर्ज दिले. आजपर्यंत ४९४ पाल्यांना रु. २५.१३ कोटी तर ५ वर्षांत १६८ पाल्यांना रु. १८.०९ कोटींचे कर्ज दिले. महिला बचत गटांची कर्जमर्यादा रु. २ लाखांवरून रु. ५ लाखांपर्यंत वाढविली. बँकेशी १६,४४७ बचत गट संलग्न आहेत. ८,२३७ गटांना रु. ९३.३२ कोटी कर्जवाटप, पाच वर्षांत १,५८४ गटांना रु. ४४.०४ कोटी कर्जवाटप केले. तसेच महिला बचत गटांसाठी स्वतंत्र रु. १०० कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती धिरज देशमुख यांनी दिली.
कसलाही माहिती न घेता
विरोधकांची बेछूट टीका
आमचं दृश्यम् नव्हे तर शुद्ध रामायण आहे, असे नमूद करून विद्यमान चेअरमन धिरज देशमुख म्हणाले, विरोधकांनी सहकाराची, बँकेची कसलीही माहिती, कसलाही अभ्यास न करता बेछूट टीका सुरू केली. अनेक गोष्टींचा विपर्यास करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. जिल्ह्याची सहकार चळवळ कोणाच्या हाती द्यायची, हे सुज्ञ मतदार ठरवतील पण विरोधकांनी टीका करण्यापेक्षा व्हिजन सांगावे, असे आवाहन त्यांनी विरोधकांना केले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE -लातूर जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनलचा शंखनाद! बाबासाहेब पाटील, धीरज देशमुख मैदानात
01:40:24
Video thumbnail
LIVE "लातूर बँकेत मोठी राजकीय खेळी! बाबासाहेब पाटील अन् धीरज देशमुख एकत्र!"
01:03:28
Video thumbnail
Mahur|एमटीडीसी रस्ते बांधकामावर भीषण दुर्घटना | २० वर्षीय मजुराचा मिक्सर मशीनखाली मृत्यू
01:33
Video thumbnail
Latur|कुरियर बॉक्स स्फोटातील नागनाथ स्वामी यांचा मृत्यू | पाच दिवसांची झुंज संपली
02:44
Video thumbnail
Latur|मनपात स्वच्छता कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन | किमान वेतन आणि दिवाळी बोनसची मागणी
03:57
Video thumbnail
Latur Diwali Travel Ticket Rates|खासगी बसकडून अवाजवी तिकीट दर आकारल्यास तक्रार करा | RTO चे आवाहन
02:55
Video thumbnail
Latur Loan Recovery|कर्जवसुलीच्या छळातून आत्महत्येचा आरोप; सावकार शहाणवाज पठाण अटकेत
03:39
Video thumbnail
Nanded Loan Recovery|दुष्काळात कर्जवसुलीला छावा संघटनेचा विरोध | चिंचोली गावातील घटना
04:55
Video thumbnail
Latur|कुरियर बॉक्स स्फोट प्रकरणात बंदूक घर मालकाला अटक | दोन कुरियर चालक आरोपी
02:25
Video thumbnail
Latur News|गांधी चौक पोलिसांनी शोधले १४ हरवलेले मोबाईल | CEIR पोर्टलची मदत
02:23
Video thumbnail
Latur News : मालमत्ता कर थकबाकीदारांवर मनपाची कडक कारवाई; 80% सवलतीचा आज शेवटचा दिवस
01:52
Video thumbnail
Latur Police Action mod| गंजगोलाईत वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च
05:39
Video thumbnail
Latur Hockey News : राज्यस्तरीय स्पर्धेस पात्र मुलींच्या हॉकी संघाला ‘माझं लातूर’चे पाठबळ
02:03
Video thumbnail
Latur Bus Stand : बसस्थानकातील सुरक्षेवरून महिला शिवसैनिक आक्रमक; पोलीस नियुक्तीची मागणी
01:39
Video thumbnail
Latur News : लातुरात गोवा बनावटीच्या दारूचा पर्दाफाश; 19 लाखांचा मुद्देमाल जप्त
03:38

Latest news