23.1 C
Latur
Tuesday, October 22, 2024
Homeसोलापूरनेताजी शिक्षण संस्थेत ५२२ जणांचे रक्तदान

नेताजी शिक्षण संस्थेत ५२२ जणांचे रक्तदान

सोलापूर : (प्रतिनिधी) श्री बृहन्मठ होटगी मठाचे परमपूज्य गुरुवर्य लिं.श्री ष.ब्र. तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या सहाव्या पुण्यस्मरणनिमित्त नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरात ५२२ रक्तदात्यांनी रक्तदान करुन श्रद्धांजली अर्पण केले.

संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली नीलम नगर येथील नेताजी शिक्षण संकुलात ३११ तर विनायक नगर येथील राजराजेश्वरी शिक्षण संकुलात २११ रक्तदात्यांनी रक्तदान केले. नेताजी सुभाषचंद्र बोस प्राथमिक मराठी, इंग्लिश मीडियम, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराचे उ‌दघाटन सेवानिवृत्त प्राचार्य रेवणसिद्ध रोडगीकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य रविशंकर कुंभार, सेवानिवृत्त प्राचार्य अंबादास चाबुकस्वार, सेवानिवृत्त शिक्षक लक्ष्मीकांत त्रिशुले, अक्षय ब्लड बँकेचे जनसंपर्क अधिकारी अजय रुपनर, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे आदी उपस्थित होते. याप्रसंगी रोडगीकर म्हणाले, तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींनी भक्तांसाठी संपूर्ण जीवन व्यतीत केले. गुरुऋणातून मुक्त होण्यासाठी सर्वांनी सामाजिक कार्यात योगदान देण्याचे आवाहन केले.

विनायकनगर येथील राजराजेश्वरी शिक्षण संकुलात प्राथमिक व माध्यमिक प्रशालेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराचे उ‌दघाटन सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष धुमशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजयकुमार हुल्ले, डॉ. हिमांशू हिरेमठ, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर म्हेत्रे, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार उपस्थित होते. शिबिर यशस्वी होण्यासाठी विठ्ठल कुंभार,प्रा.अंगद तोरणे, प्रा. पिरप्पा अंबारे, प्रा. राजश्री स्वामी, धर्मराज बळ्ळारी, गणपती पाटील,सिद्धाराम बिराजदार, षडाक्षरी हिरेमठ, विनायक कोरे,जयश्री बिराजदार, वैशाली इंडे, जगदेव गवसने, सुनीता पवार, शैलेश स्वामी, गोदावरी कुंभार ,शिवानंद पुजारी, विश्वराध्य मठपती, विश्वनाथ तंबाके,शीतल पाटील,मारुतीराव कांबळे, हणमंत कुरे, संगीता नरगिडे, चंद्रकांत पाटील, मल्लिकार्जुन बिराजदार आदींनी परिश्रम घेतले.अक्षय व अश्विनी बँकेचे सहकार्य लाभले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR