21 C
Latur
Tuesday, October 22, 2024
Homeराष्ट्रीयबिल्किस बानो प्रकरणातील ९ दोषी फरार

बिल्किस बानो प्रकरणातील ९ दोषी फरार

नवी दिल्ली : देशभरात चर्चेत आलेल्या बिल्कीस बानो प्रकरणातील सर्व दोषी ११ जणांना पुन्हा एकदा ताब्यात घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर आता बिल्किस बानो प्रकरणातील बहुतांश गुन्हेगारांचा सध्या पत्ता नाही. ११ पैकी किमान ९ दोषी सध्या आपापल्या घरी नाहीत आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही त्यांची माहिती नाही.

सोमवारी (८ जानेवारी, २०२४), सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी निर्णय दिल्यानंतर काही तासांनंतर, गुजरातच्या दाहोदमधील दोषींच्या (राधिकापूर आणि सिंगवाड) गावात माध्यमे पोहोचली, तेव्हा त्यांना त्यांच्या दाराला कुलूप लावले असल्याचे दिसून आले.

सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?

न्यायमूर्ती बी. न्यायमूर्ती व्ही. नागरथना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने ११ दिवसांच्या सुनावणीनंतर दोषींच्या शिक्षेच्या माफीला आव्हान देणा-या याचिकांवर गेल्या वर्षी १२ ऑक्टोबर रोजी निर्णय राखून ठेवला होता. त्यावर आज गुजरात सरकारला न्यायालयाने झटका दिला आहे. सरकारला शिक्षा माफ करण्याचा आधिकार नव्हता असे न्यायालयाने म्हटले आहे.

गुजरात सरकारने त्यांच्या सुटकेचा निर्णय घेण्यापूर्वी ज्या कोर्टात या खटल्याची सुनावणी झाली होती, त्या न्यायालयाचे मत घ्यायला हवे होते. ज्या राज्याने आरोपींना शिक्षा सुनावली होती, त्या राज्याने त्यांच्या सुटकेचा निर्णय घ्यायला हवा होता. महाराष्ट्रात शिक्षा झाली होती. या आधारावर, रिलीझ ऑर्डर रद्द करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR