महादेव बेटिंग अ‍ॅपचे नागपूरपर्यंत जाळे

नागपूर : महादेव ऑनलाइन बुक या अवैध ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्मविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) देशव्यापी कारवाई केली आहे. सहा राज्यांतील ३३ ठिकाणी एकाच वेळी झडती घेण्यात आली. यात नागपूरचाही समावेश असून बेटिंग पॅनल चालवणा-या ऑपरेटर्सच्या ठिकाणांना लक्ष केले जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महादेव बेटिंग अ‍ॅपसाठी एजंट म्हणून काम करणा-या एका व्यक्तीच्या घरी झडती घेण्यात आल्याची माहिती आहे. महादेव बेटिंग अ‍ॅपसाठी गुंतवणूकदार शोधणे आणि त्यांच्याकडून घेतलेले पैसे दिलेल्या ठिकाणी पोहोचवण्याचे काम एजंट करीत होता. त्या मोबदल्यात त्याला कमिशन मिळत होते अशी माहिती सूत्रांनी दिली. पंजाबमधील अमृतसर, दिल्ली, राजस्थानमधील नागौर व धौलपूर, मध्य प्रदेशातील भोपाळ व इंदूर, छत्तीसगडमधील रायपूर व दुर्ग, गुजरातमधील अहमदाबाद, वडोदरा व सुरत तसेच महाराष्ट्रातील मुंबई आणि नागपूर येथे ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणांवरून जप्त कागदपत्रांमध्ये इतरांच्या नावाने उघडलेली किंवा भाड्याने घेतलेली बँक खाती व हवाला व्यवहारांचे पुरावे मिळाल्याचे सीबीआयने स्पष्ट केले. महादेव अ‍ॅपचा प्रमुख प्रवर्तक सौरभ चंद्राकर याच्या चौकशीतून मिळालेली माहिती कारवाईसाठी महत्त्वाची ठरली. ओमानमधून प्रत्यार्पणानंतर सीबीआयने १ नोव्हेंबरला त्याला अटक केली. रायपूरच्या न्यायालयाने त्याला ८ दिवसांची कोठडी दिली होती.

परदेशातून मुख्य नियंत्रण, भारतात पॅनलचे जाळे
या बेटिंग प्लॅटफॉर्मचे मुख्य कार्यालय परदेशातून चालवले जात होते. भारतात फ्रँचायझी पद्धतीने पॅनल ऑपरेटर्सचे जाळे उभारण्यात आले होते. हे ऑपरेटर्स ग्राहकांना बेटिंगसाठी आयडी उपलब्ध करून देत, त्यांच्याकडून पैशांचे व्यवहार स्वीकारत आणि अन्य व्यक्तींच्या नावावरील बँक खात्यांमध्ये रक्कम जमा करीत होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded News | पाकिस्तानी क्रीममध्ये 48 हजार पट पारा! फॉरेन्सिक अहवालात धक्कादायक निष्कर्ष
03:02
Video thumbnail
Nanded|शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन
05:43
Video thumbnail
Solapur Well Collapse: आंबे गावात विहीर खचली; चार जण मातीखाली अडकले, बचावकार्य सुरू
01:16
Video thumbnail
Latur Accident News: टाका पाटीजवळ भीषण अपघात; दोघांचा दुर्दैवी मृत्यू
00:41
Video thumbnail
Latur Bank Election : लातूरचा मतदार सन्मान गहाण ठेवणारा नाही – आमदार अमित देशमुख यांचे मोठे वक्तव्य
05:40
Video thumbnail
Latur District Bank Election: योग्य उमेदवाराला मतदान करा – दिलीपराव देशमुखांचे आवाहन
01:10
Video thumbnail
Nanded News: आंतरपिकात गांजाची लागवड; 9 लाख 24 हजारांचा गांजा जप्त, किनवटमध्ये LCB ची कारवाई
00:43
Video thumbnail
Latur District Bank Election: धमक्या, द्वेषाशिवाय विरोधकांनी काही केलं नाही – धीरज देशमुखांचा प्रहार
04:38
Video thumbnail
Latur District Bank Election 2026: जिल्हा बँकेची सत्ता कुणाची?
11:10
Video thumbnail
Latur District Bank Election: उद्या मतदान, ३० उमेदवार आणि ९९९ मतदार
03:17
Video thumbnail
Latur Blood Shortage: लातूर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा; AB Positive रक्तगटाची सर्वाधिक टंचाई
03:28
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलच्या विजयाचा धीरज देशमुखांना विश्वास
06:14
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलला साथ द्या – ॲड. उदय गवारे यांचे आवाहन
02:59
Video thumbnail
Latur Tur Price: तुरीला 10,871 रुपये क्विंटलचा विक्रमी भाव! दुष्काळामुळे आवक घटली
03:04
Video thumbnail
Exclusive Interview|प्रा.डॉ.विश्वनाथ कराड यांचा जीवनप्रवास! लहानपणापासून मानवता तीर्थपर्यंतचा प्रवास
08:40

Latest news