पुणे-गुवाहाटी विमानाचे लँडिंग गिअर निकामी

पुणे : पुण्याहून गुवाहाटीकडे निघालेल्या इंडिगोच्या विमानात उड्डाणानंतर काही वेळातच मोठा तांत्रिक बिघाड झाल्याने एकच खळबळ उडाली. विमानाचे लँडिंग गिअर उड्डाणानंतर आत न घेता आल्याने विमानाचे पुणे विमानतळावर तातडीने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या विमानात एकूण १९२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. विमानाचे तात्काळ लँडिंग केल्याने मोठा अनर्थ टळला असून सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

रविवारी सकाळी इंडिगोचे ६ई ०६२३ हे विमान पुण्याहून गुवाहाटीच्या दिशेने निघाले होते. पण टेक ऑफ केल्यानंतर विमानाची चाके नेहमीप्रमाणे आत न जाता बाहेरच राहिली. हा तांत्रिक बिघाड लक्षात येताच वैमानिकाने तात्काळ एअर ट्रॅफिक कंट्रोलला याबाबत माहिती दिली.

हवाई दलाकडून फुल इमर्जन्सी जाहीर
पुणे विमानतळ भारतीय हवाई दलाच्या तळावरून चालवले जात असल्याने, माहिती मिळताच हवाई दलाने विमानतळावर फुल इमर्जन्सी जाहीर केली. विमानतळ प्रशासन, एटीसी आणि आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले. अग्निशमन दलाच्या गाड्या, रुग्णवाहिका रनवेवर तैनात करण्यात आली.

धावपट्टीवरून लो पास आणि सुरक्षित लँडिंग
विमान खाली उतरवण्यापूर्वी जमिनीवरील तज्ज्ञांना लँडिंग गिअरची प्रत्यक्ष पाहणी करता यावी, यासाठी वैमानिकाने खबरदारीचा उपाय म्हणून धावपट्टीवरून विमान जमिनीच्या अगदी जवळून उडवून पाहिले. त्यानंतर सकाळी ९ वाजून ४ मिनिटांनी हे विमान पुणे विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले.

सर्व १९२ प्रवासी सुखरूप; पर्यायी विमानाची व्यवस्था
लँडिंगनंतर विमानाला बे क्रमांक ७ वर नेण्यात आले. विमान पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री पटल्यानंतर सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी एटीसीने फुल इमर्जन्सी मागे घेतली. त्यानंतर विमानाला एरोब्रिज जोडून सर्व १९२ प्रवासी आणि कर्मचा-यांना सुखरूप खाली उतरवण्यात आले. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. प्रवाशांच्या पुढील प्रवासासाठी इंडिगो कंपनीकडून दुसरे विमान मागवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

लँडिंग गिअर आत न गेल्यास काय होते?
विमानाचे लँडिंग गिअर जर आत गेले नाही, तर हवेचा दाब वाढतो आणि वेगावर परिणाम होतो, ज्यामुळे लांबचा प्रवास करणे धोक्याचे ठरू शकते. मात्र, चाके बाहेरच असल्याने लँडिंगच्या वेळी मोठा धोका निर्माण होत नाही. वैमानिकाने विमान तात्काळ पुण्यात परत आणल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded News | पाकिस्तानी क्रीममध्ये 48 हजार पट पारा! फॉरेन्सिक अहवालात धक्कादायक निष्कर्ष
03:02
Video thumbnail
Nanded|शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन
05:43
Video thumbnail
Solapur Well Collapse: आंबे गावात विहीर खचली; चार जण मातीखाली अडकले, बचावकार्य सुरू
01:16
Video thumbnail
Latur Accident News: टाका पाटीजवळ भीषण अपघात; दोघांचा दुर्दैवी मृत्यू
00:41
Video thumbnail
Latur Bank Election : लातूरचा मतदार सन्मान गहाण ठेवणारा नाही – आमदार अमित देशमुख यांचे मोठे वक्तव्य
05:40
Video thumbnail
Latur District Bank Election: योग्य उमेदवाराला मतदान करा – दिलीपराव देशमुखांचे आवाहन
01:10
Video thumbnail
Nanded News: आंतरपिकात गांजाची लागवड; 9 लाख 24 हजारांचा गांजा जप्त, किनवटमध्ये LCB ची कारवाई
00:43
Video thumbnail
Latur District Bank Election: धमक्या, द्वेषाशिवाय विरोधकांनी काही केलं नाही – धीरज देशमुखांचा प्रहार
04:38
Video thumbnail
Latur District Bank Election 2026: जिल्हा बँकेची सत्ता कुणाची?
11:10
Video thumbnail
Latur District Bank Election: उद्या मतदान, ३० उमेदवार आणि ९९९ मतदार
03:17
Video thumbnail
Latur Blood Shortage: लातूर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा; AB Positive रक्तगटाची सर्वाधिक टंचाई
03:28
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलच्या विजयाचा धीरज देशमुखांना विश्वास
06:14
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलला साथ द्या – ॲड. उदय गवारे यांचे आवाहन
02:59
Video thumbnail
Latur Tur Price: तुरीला 10,871 रुपये क्विंटलचा विक्रमी भाव! दुष्काळामुळे आवक घटली
03:04
Video thumbnail
Exclusive Interview|प्रा.डॉ.विश्वनाथ कराड यांचा जीवनप्रवास! लहानपणापासून मानवता तीर्थपर्यंतचा प्रवास
08:40

Latest news