तटकरेंची येत्या काही दिवसांत राष्ट्रवादीतून हकालपट्टी निश्चित

पुणे : अजित पवारांचे निधन होऊन नऊ महिने होत आले. अनेक पत्रकारांनी विलिनीकरणाबद्दल प्रश्न विचारले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, मी प्रदेशाध्यक्ष आहे, मला काही माहिती नाही. असे असते तर अजित पवारांनी मला सांगितले असते. पण, नऊ महिन्यांनी त्यांना असे स्वप्न पडले की, अजित पवारांनी सांगितले की दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण करायचे. कारण यात त्यांचा स्वार्थ दडलाय, काही दिवसांत त्यांची हकालपट्टी निश्चित आहे. भरतशेठ त्यांना आपल्याकडे घेऊ नका असे विधान शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी केले.

श्रीवर्धनमध्ये झालेल्या एका पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात महेंद्र दळवी बोलत होते. सुनील तटकरे यांची हकालपट्टी अटळ आहे. ज्या काही घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहेत. त्यानुषंगाने ही ब्याद दोन-तीन लोक घेऊन बाहेर पडणार. भरतशेठ मला वाटत नाही कुणी सोबत येईल असे महेंद्र दळवी म्हणाले. आमदार महेंद्र दळवी म्हणाले, श्रीवर्धन मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. तटकरेंनी त्याला हायजॅक केलं होतं. आता यापुढे हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहणार. आता तटकरेंच्या विरोधात वातावरण तयार झाले आहे. यापुढे होणा-या निवडणुका सुनील तटकरेंच्या विरोधात असतील अशी टीका आमदार दळवी यांनी केली. आपल्या चुका तटकरेंना फायदेशीर ठरल्या आहेत. मी शिवसेनेत आलो नसतो, तर कुठल्या तरी अडगळीत पडलो असतो. सुनील तटकरे यांनी अनेकांना फसवून, वापर करून सोडून दिले आहे. अनिकेत तटकरे हा सरोगसी बाळ म्हणूनच जन्माला आलेले आहे असे टीकास्त्र आमदार दळवींनी डागले.

आता ते आमच्याच अंगाशी आले आहे : आमदार दळवी
आमदार दळवी पुढे बोलताना म्हणाले की लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांना तिकीट देण्याबद्दल मी स्वत: बोललो होतो. आता ते आमच्याच अंगाशी आले आहे. मी त्याच पट्ट्यातील मातब्बर खिलाडी आहे. मी बैलगाडाचा खिलाडी आहे. त्यामुळे कुठला बैल कधी बदलायचा, हे मला माहिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस तटकरेंच्या बापाची जहागिरी नाही
तटकरे कुटुंब स्वार्थी आहे. महाराष्ट्राच्या पटलावर त्यांचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. राष्ट्रवादी म्हणजे तटकरेंच्या बापाची जहागिरी नाही. यापुढे तटकरेंना मदत न करणे योग्य राहील. मी विधान परिषदेला लढलो असतो, तर निवडून आलो असतो. सुनील तटकरेंच्या घरी आणि त्यांच्या सावलीखाली कधीही जाऊन नका, असा सल्ला आमदार महेंद्र दळवी पालकमंत्री भरत गोगावले यांना दिला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded News | पाकिस्तानी क्रीममध्ये 48 हजार पट पारा! फॉरेन्सिक अहवालात धक्कादायक निष्कर्ष
03:02
Video thumbnail
Nanded|शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन
05:43
Video thumbnail
Solapur Well Collapse: आंबे गावात विहीर खचली; चार जण मातीखाली अडकले, बचावकार्य सुरू
01:16
Video thumbnail
Latur Accident News: टाका पाटीजवळ भीषण अपघात; दोघांचा दुर्दैवी मृत्यू
00:41
Video thumbnail
Latur Bank Election : लातूरचा मतदार सन्मान गहाण ठेवणारा नाही – आमदार अमित देशमुख यांचे मोठे वक्तव्य
05:40
Video thumbnail
Latur District Bank Election: योग्य उमेदवाराला मतदान करा – दिलीपराव देशमुखांचे आवाहन
01:10
Video thumbnail
Nanded News: आंतरपिकात गांजाची लागवड; 9 लाख 24 हजारांचा गांजा जप्त, किनवटमध्ये LCB ची कारवाई
00:43
Video thumbnail
Latur District Bank Election: धमक्या, द्वेषाशिवाय विरोधकांनी काही केलं नाही – धीरज देशमुखांचा प्रहार
04:38
Video thumbnail
Latur District Bank Election 2026: जिल्हा बँकेची सत्ता कुणाची?
11:10
Video thumbnail
Latur District Bank Election: उद्या मतदान, ३० उमेदवार आणि ९९९ मतदार
03:17
Video thumbnail
Latur Blood Shortage: लातूर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा; AB Positive रक्तगटाची सर्वाधिक टंचाई
03:28
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलच्या विजयाचा धीरज देशमुखांना विश्वास
06:14
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलला साथ द्या – ॲड. उदय गवारे यांचे आवाहन
02:59
Video thumbnail
Latur Tur Price: तुरीला 10,871 रुपये क्विंटलचा विक्रमी भाव! दुष्काळामुळे आवक घटली
03:04
Video thumbnail
Exclusive Interview|प्रा.डॉ.विश्वनाथ कराड यांचा जीवनप्रवास! लहानपणापासून मानवता तीर्थपर्यंतचा प्रवास
08:40

Latest news