राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊ दे

बळीराजा, जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी नांदू दे; उपमुख्यमंत्र्यांचे पांडुरंगाला साकडे

नांदेड जिल्ह्यातील शिंदे दाम्पत्य मानाचे वारकरी; वर्षभर एसटीचा मोफत प्रवास

पंढरपूर : प्रतिनिधी
राज्यातील दुष्काळी परिस्थिती दूर होऊन बळीराजा आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवनात सुख, समृद्धी व समाधान नांदू दे, असे साकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.

कार्तिकी यात्रा २०२६ निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आयोजित शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी सुधाकर दशरथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली. यानंतर मंदिर समितीच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार संजय जाधव, आमदार अभिजित पाटील, बापूसाहेब पठारे, राजू खरे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव, समिती सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते.

राज्यातील ३१० तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली. खरीप व रबी हंगामातील पाऊस अत्यंत कमी झाल्याने शेतक-यांवर मोठे संकट ओढवले असून, शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. अशा संकटाच्या काळात शासन शेतक-यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. दुष्काळी परिस्थिती दूर होऊन चांगला पाऊस पडावा, बळीराजावरील संकट दूर व्हावे आणि त्याच्या जीवनात सुख-समाधानाचे दिवस यावेत, असे साकडे पांडुरंगाला घातल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

प्रारंभी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे तसेच मानाचे वारकरी सुधाकर दशरथ शिंदे व त्यांच्या पत्नी प्रणिता सुधाकर शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मानाचे वारकरी शिंदे दाम्पत्याचा श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती व वस्त्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच एसटी महामंडळातर्फे देण्यात येणारा एक वर्षाचा मोफत प्रवास पास त्यांना प्रदान करण्यात आला. मंदिर समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री शिंदे यांचाही सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले तर आभार कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी मानले.

पंढरपूर कॉरिडॉरचे काम
विश्वासात घेऊनच
आषाढी व कार्तिकी यात्रेदरम्यान वारक-यांना उपलब्ध करून देण्यात येणा-या सुविधांमध्ये दरवर्षी सुधारणा करण्यात येत आहेत. वारक-यांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याकरिता शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जात आहे. दर्शन मंडपासाठी आवश्यक असलेला अतिरिक्त २५ कोटी रुपयांचा निधी पर्यटन विभागामार्फत तत्काळ उपलब्ध करून देण्यात आला. पंढरपूर कॉरिडॉरचे काम सर्व संबंधितांना विश्वासात घेऊनच करण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

सुर्यकांत सरन्यायाधीशांच्या खुर्चीवर बसण्याच्या लायक नाहीत

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

अक्वान चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका

चंद्रपूर : बंगालच्या उपसागरात गेल्या महिनाभरात तयार झालेले अक्वान...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूर रेल्वे कोच कारखान्याची धीरज देशमुखांकडून पाहणी; रोजगार आणि वंदे भारत बोगींचा आढावा
06:39
Video thumbnail
Nanded|हदगावमध्ये बोगस डॉक्टरला अटक? आरोग्य विभागाची नागमाता दवाखान्यावर धाड
00:47
Video thumbnail
Latur|नांदगाव ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा आरोप; ग्रामस्थांचे उलटी हलगी वाजवून आंदोलन
10:08
Video thumbnail
Nanded|अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या कामावरून वाद; काँग्रेसचे आरोप, अशोक चव्हाणांचे प्रत्युत्तर
04:12
Video thumbnail
Nanded|हिमायतनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या सुविधांचा आढावा; अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबवर कारवाई होणार?
03:47
Video thumbnail
Latur|CBI चार्जशीटमध्ये नाव असलेल्यांनी खुलासा करावा; धिरज देशमुखांचा विरोधकांना सवाल
03:59
Video thumbnail
Latur|विलास सहकारी साखर कारखान्याचे वजनकाटे पारदर्शक? अचानक तपासणीत तफावत नसल्याचा दावा
03:38
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये श्वान निर्बीजीकरण कामाची चौकशी होणार; स्थायी समितीचा मोठा निर्णय
06:35
Video thumbnail
Latur|संविधान हा राष्ट्रीय ग्रंथ; संविधान दिन जनजागृतीतून साजरा करा – भंते पय्यानंद
03:19
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये संविधान दिन उत्साहात; संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन
02:17
Video thumbnail
Latur|आयुष्यमान भारत मिशनचा लातूर जिल्ह्यात आढावा; ५७ टक्के लाभार्थ्यांची कार्ड जनरेट
02:44
Video thumbnail
Beed|कपिलधार येथे मन्मथ स्वामींच्या दर्शनासाठी अलोट गर्दी; कार्तिक पौर्णिमेला हजारो भाविक दाखल
01:28
Video thumbnail
Sanjay Bansode|कृष्णा खोऱ्यातील 2 टीएमसी पाणी लातूरला द्या! संजय बनसोडेंची मागणी
03:50
Video thumbnail
Dhiraj Deshmukh|धिरज देशमुख जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी; निवडीनंतर जल्लोष आणि भव्य रॅली
02:07
Video thumbnail
Latur DCC Bank Election| बँकेच्या चेअरमनपदी पुन्हा धिरज देशमुख; उपाध्यक्षपदी अविनाश जाधव पाटील
06:17

Latest news