एफएसएसएआयची चाचणी, नमुने दोनवेळा फेल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
बाटलीबंद पाणी आपण डोळेबंद करून बिनधास्त पित असतो. मात्र, देशातील सर्वात प्रसिद्ध बिसलेरी कंपनीवर कारवाई करण्यात आली. खाद्य पदार्थांचे सुरक्षा पाहणारी सरकारी संस्था एफएसएसएआयने रविवारी बिसलेरीच्या विरोधात कोर्टात केस चालवण्यास मंजुरी दिली. कारण या बाटलीबंद पाण्याचे नमूने दोनदा चाचणीत फेल झाले आहेत. याचा अर्थ बिसलेरीचे पाणी पिण्याच्या लायक नसल्याचे या तपासणीत आढळले आहे.
पहिल्या चाचणीत पाण्यात आरोग्यासाठी धोकादायक मानले जाणा-या ब्रोमेटची पातळी परवानगी असलेल्या प्रमाणापेक्षा जास्त असल्याचे आढळले. कंपनीने यावर आक्षेप घेतला आणि दुसरी चाचणी घेण्यात आली. परंतु त्यातही पाणी असुरक्षित असल्याचे आढळले. यावेळी पीएएच नावाचे कर्करोगकारक घटकही पाण्यात आढळले आहेत. धक्कादायक म्हणजे पाण्याचे नमुने बाजारातून नव्हे तर बिसलेरीच्या आवारातून गोळा करण्यात आले होते. ब्रोमेट आणि पीएएच या दोन्हींना कर्करोग कारक पदार्थ म्हणून वर्गीकृत करण्यात आलेले आहे.
५० वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या या ब्रँडवरील कारवाईने लोकांना धक्का बसला आहे. मात्र, एफएसएसएआयने केवळ बिसलेरीवरच नव्हे तर इतर कंपन्यांवरही कारवाई केली आहे.
बसलेरीचे पाणी
पिण्यास अयोग्य!
बिसलेरीवरील कारवाईबाबत एफएसएसएआयने म्हटले आहे की हे पाणी पिण्यास अयोग्य आहे आणि अन्न सुरक्षा आणि मानक कायदा, २००६ अंतर्गत कंपनीवर गुन्हा दाखल केला जाईल. मात्र, या कंपनीने याबद्दल त्यांची बाजू मांडलेली नाही, असे सांगण्यात आले.
















