28.6 C
Latur
Wednesday, May 14, 2025
Homeलातूरमांजरा साखर कारखान्याचा पुणे येथे सन्मान

मांजरा साखर कारखान्याचा पुणे येथे सन्मान

लातूर : प्रतिनिधी
वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट मांजरी  पुणे येथील  संस्थेकडून देण्यात येणारा राज्य पातळीवरील उत्तर पूर्व विभागातील उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार येथील विलासनगर येथील  विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यास पुणे येथील वसंतदादा शुगर इंस्टिट्युट येथे आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सोहळयात देशाचे माजी कृषीमंत्री  खासदार शरद पवार व राज्याचे सहकार मंत्री  दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते गुरुवारी  प्रदान करण्यात आला  विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख सर्व संचालक मंडळानी हा पुरस्कार स्वीकारला असून या सोहळयाला साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री आमदार जयंत पाटील, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, वसंतदादा शुगरचे संचालक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा कारखान्याचे संचालक अशोकराव काळे, बंकटराव कदम, वसंतराव उफाडे, सदाशिव कदम, कैलास पाटील, ज्ञानेश्वर पवार, शंकर बोळंगे, सूर्यकांत पाटील, निळकंठ बचाटे (पवार), सचिन शिंदे, धनराज दाताळ, नवनाथ काळे, अनिल दरकसे, शेरखाँ  पठाण, तज्ज्ञ संचालक  ज्ञानेश्वर भिसे, विशाल पाटील, विलास चामले कार्यकारी संचालक पंडित देसाई, कारखान्याचे विविध  खाते प्रमुख आदींची उपस्थिती होती.
कारखान्याने गळीत हंगाम २०२२-२०२३ मध्ये मिलमधील उसाचा तंतूमय निर्देशांक, रिडयुस्ट मिल एक्स्ट्रॅक्शन, साखर तयार करण्यासाठी लागणा-या वाफेचा, विजेचा, बगॅस वापर, गाळप क्षमतेच्या वापरामध्ये वाढ, गाळप क्षमतेचा वापर,तसेच  इतर निकष पाहता सदरील पुरस्कार विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यास देण्यात आला आहे.  सदरील पुरस्कारा बद्दल सर्व स्तरातून मांजरा कारखाना साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव  देशमुख, कारखान्याचे संचालक  माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख  व सर्व संचालकांचे मंडळाचे  सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR