मुंबई : देवेंद्र फडणवीस हे शूर्पणखेच्या भूमिकेत गेलेले असून ते अनेक मायावी रुप धारण करून महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत. २०२४ मध्ये शूर्पणखेचे नाकच कापू असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. फडणवीस एक नंबरचे खोटारडे आहेत. बाळासाहेब वाघ असतील तर तुम्ही महाराष्ट्राला लागलेले डाग आहे. कधी असे ऐकले आहे का की कोण आला रे कोण आला भाजपचा वाघ आला. शिवसेना हीच खरी वाघांची सेना आहे, असे रौय म्हणाले.
बाबरी पा़डल्यानंतर त्याचे आरोपपत्र एकदा फडणवीसांनी पाहावे. राम मंदीर फक्त एकाच व्यक्तीमुळे उभे राहिले आहे असे त्यांना वाटत आहे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे चेलेचपाटे एक नंबरचे खोटारडे आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणजे शुर्पणखा, या शुर्पणखेचे नाक कापल्याशिवाय आम्ही राहणार नाही. देशातील सर्वात मोठे शंकराचार्य नरेंद्र मोदी आहेत, असे भाजपाला वाटत असावे. त्यामुळे श्री राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाला शंकराचार्य येत नसतील. अर्धवट झालेल्या राम मंदिराच्या उद्घाटनावर चारही शंकराचार्यांनी बहिष्कार घातला आहे, असे संजय राऊत म्हणाले.
मणिपुरातील राम मंदिरात शिवसेना जाणार
मोदींचा काळाराम मंदिरातील कार्यक्रम ऐनवेळी ठरला आहे. कारण उद्धव ठाकरे २२ तारखेला काळाराम मंदिरात जाऊन पूजा करणार होते म्हणून यांनी हा कार्यक्रम केला. मी सांगंतो उद्धव ठाकरे मणिपुरातील राम मंदिरात शिवसेना जाणार आहे, तेव्हा मोदींनी मणिपुरातही यावे, असे संजय राऊत म्हणाले.