16.2 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा आंदोलनाविरोधात अ‍ॅड. सदावर्ते हायकोर्टात

मराठा आंदोलनाविरोधात अ‍ॅड. सदावर्ते हायकोर्टात

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन पेटले आहे. याच आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेमध्ये मराठा आंदोलकांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावर ८ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी २५ ऑक्टोबर पासून दुस-या टप्प्यातील आमरण उपोषणाची हाक दिली. त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या. याच पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्तेंनी मराठा आंदोलनाविरोधात याचिका दाखल केली. मराठा आरक्षणाच्या विरोधात सदावर्ते यांनी यापूर्वीही याचिका केली होती. त्यांच्या याचिकेमुळे मराठा आरक्षण रद्द करण्यात आले होते.

मराठा आरक्षणाच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याआधी जेव्हा मराठा आरक्षणाचा निर्णय लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला, तेव्हा सदावर्तेंनी त्याला आव्हान दिले. पण उच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकले. जे सर्वोच्च न्यायालयात टिकू शकले नाही. पण आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलन तीव्र होत असल्याचे चित्र आहे. याच आंदोलनाला गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध दर्शवला आहे.

मराठा समाजाने आंदोलनाचे हत्यार उपसल्यापासून गुणरत्न सदावर्ते सातत्याने समाजावर टीका करत होते. त्यामुळे मराठा समाज नाराज होता. गुणरत्न सदावर्ते यांना बोलू नका, असाही इशारा देण्यात आला होता. जरांगे पाटील यांनीही थेट इशारा दिला होता. त्यानंतरदेखील सदावर्ते वादग्रस्त वक्तव्य करत आहे.

सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड
काही दिवसांपूर्वी गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. त्यांच्या गाडीची तोडफोड करणा-यांनी मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी केल्याचं यावेळी निदर्शनास आलं. त्यातच त्यांच्या पत्नी जयश्री पाटील आणि गुणरत्न सदावर्ते हे मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका करणारे मुख्य याचिकाकर्ते होते. त्यामुळे मराठा आंदोलकांनी गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड केल्याचं म्हटलं जात होतं.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR