23 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeराष्ट्रीयमोहम्मद फैजल यांना खासदारकी बहाल; राष्ट्रवादीला दिलासा

मोहम्मद फैजल यांना खासदारकी बहाल; राष्ट्रवादीला दिलासा

नवी दिल्ली: राष्ट्रवादीचे लक्ष्यद्विपचे खासदार मोहम्मद फैजल यांची रद्द करण्यात आलेली खासदारकी त्यांना पुन्हा देण्यात आली आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी फैजल यांची खासदारकी पुन्हा बहाल केली. या संबंधी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्षांना तीन वेळा पत्र लिहिलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

कोर्टाच्या आदेशानंतर खासदार मोहम्मद फैजल यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. मात्र कोर्टाने पुन्हा एकदा त्यांना खासदारकी बहाल केली. पण न्यायालयाच्या आदेशानंतरही फैजल यांची खासदारकी बहाल करण्यात येत नव्हती. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी मागील वीस दिवसात तीन वेळा लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं होतं. न्यायालयाच्या आदेशानंतरही लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या प्रकरणात दिरंगाई केल्याने सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR