30.2 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्र१० दिवसांत राज्याचा पाणीसाठा निम्यावर

१० दिवसांत राज्याचा पाणीसाठा निम्यावर

मुंबई : राज्याच्या पाणीसाठ्यात अवघ्या १० दिवसांत तीन टक्क्यांनी घट झाली आहे. धरणांमध्ये सध्या केवळ ५८.८४ टक्के पाणी शिल्लक आहे. छत्रपती संभाजीनगर येथील पाणीसाठा झपाट्याने घटत आहे. येथे मोठ्या, मध्यम आणि लहान धरणांमध्ये वापरासाठी ३४.५६ टक्केच पाणी उपलब्ध आहे. तर, उजनी धरणात केवळ आठ टक्के साठा उरला आहे.

राज्यभरात पाणीप्रश्न आठवड्यागणिक बिकट होत चालला आहे. सरकारच्या पाणीपुरवठा विभागाच्या आकडेवारीनुसार, सध्या ४५८ गावे आणि १०५६ वाड्यांना एकूण ४८० टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवले जात आहे. राज्यातील एकूण दोन हजार ९९४ लहान-मोठ्या धरणांतील जलसाठ्यांची आकडेवारी पाहता, नववर्षाच्या पहिल्या पंधरवड्यातच पाणीप्रश्न बिकट होत असल्याचे स्पष्ट होते.

सद्यस्थितीत राज्यातील सर्व धरणांमध्ये मिळून ५८.८४ टक्के इतकाच जलसाठा उपलब्ध आहे. यात छत्रपती संभाजीनगर विभागाची स्थिती सर्वांत बिकट आहे. त्याखालोखाल नागपूर विभागातील पाणीसाठा असून, विभागातील एकूण ३८३ धरणांमध्ये ६६.०३ टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. राज्यातील एक मोठे धरण म्हणून सोलापुरातील उजनी धरणाची ओळख आहे. यातील पाणीसाठ्यानेही तळ गाठला आहे. लवकरच धरणाचा मृतसाठा वापरण्याची वेळ येणार आहे. कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग भागातील धरणांमध्ये अजूनही समाधानकारक पाणीसाठा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR