छत्रपती संभाजीनगर : आमच्या पक्षाला राज्यात एक मंत्रिपद आणि लोकसभेसाठी दोन जागा द्याव्यात’, अशी मागणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले, देशात भाजपला मोठे बहुमत असले तरी ‘एनडीए’चे सरकार म्हणून ओळखले जाते. त्यात ‘आरपीआय’चा समावेश आहे.
राज्यातील गावागावांमध्ये कार्यकर्ते व पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे राज्यात मंत्रिमंडळ विस्तारात आम्हाला एक मंत्रिपद द्यावे, या मागणीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याशी बोलणार आहे. लोकसभेच्या शिर्डी मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी मी इच्छुक आहे, असेही रामदास आठवले म्हणाले.