बदलापूर : बदलापूर पूर्व खरवई एमआयडीसी परिसरातील वी.के. केमिकल कंपनीमधील ज्वलनशील रसायन भरलेल्या यंत्राचा दाब वाढल्याने, पहाटे ४.१५ ते ४.३० च्या दरम्यान झालेल्या स्फोटात कंपनी व परिसरात भीषण आग लागली.
यावेळी रात्रीच्या वेळेत ड्युटी वर असलेल्या पाच कर्मचा-यांपैकी एकाचा घटनास्थळी आगीत सापडून जागीच मृत्यू झाला, तर इतर चार कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या रासायनिक स्फोटाने चार ते पाच किमी अंतरावर जोरदार हादरे बसले. व आगीचे लोळ दिसले. यावेळी आग लागल्याची माहिती पोलिस प्रशासनाला मिळताच त्यांनी अग्निशामक दलाला ही माहिती दिली.