28.5 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeउद्योगटाटा स्टीलमधील ३ हजार कर्मचा-यांच्या नोक-या जाणार

टाटा स्टीलमधील ३ हजार कर्मचा-यांच्या नोक-या जाणार

लंडन : टाटा स्टील कंपनी ब्रिटनमधील व्यवसाय बंद करणार असून, त्यामुळे ३ हजार कर्मचा-यांच्या नोक-यांवर गदा येणार आहे. कंपनी आता ब्रिटनमधील पोर्ट टॅलबोट ब्लास्ट फर्नेस (लोखंड निर्मिती) बंद करत आहे.

कंपनीने याबाबतचा निर्णय अद्याप जाहीर केला नाही. टाटा अधिका-यांनी लंडनमधील ताज हॉटेलमध्ये कामगार संघटनांसोबत बैठक घेतल्यानंतर ते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

यूकेमधील टाटा स्टीलचा व्यवसाय कंपनीसाठी तोट्याचा व्यवसाय बनला आहे. पोर्ट टॅलबोट प्लांटमुळे कंपनीला दुस-या तिमाहीत ६५११ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला.

कंपनीने अलीकडेच ब्रिटीश सरकारसोबत करार केला आहे, ज्यानुसार ब्लास्ट फर्नेसेस (लोखंड निर्मिती) इलेक्ट्रिक फर्नेसने बदलण्यात येतील, ज्यामुळे खर्च कमी होईल आणि प्रदूषण कमी होईल. हा करार सुमारे ६१ कोटी डॉलरचा आहे.

करारानुसार, वेल्समधील पोर्ट टॅलबोट प्रकल्पात एकूण १२५ कोटी पौंडांची गुंतवणूक केली जाईल. यापैकी ५० कोटी पौंड म्हणजेच ६१ कोटी डॉलर्स अनुदान स्वरूपात टाटा स्टीलला मिळणार आहेत. उर्वरित रक्कम टाटा स्टील गुंतवणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR