धाराशिव : प्रतिनिधी
श्रीक्षेत्र तुळजापूर येथे आई तुळजाभवानी देवीचे साडेतीन शक्तीपीठापैकी एक पुर्णपीठ आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शारदीय नवरात्र उत्सव १३ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत पार पडला. पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्र्णी व अपर पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव पोलीसांनी नवरात्र उत्सवात दमदार कामगिरी केली आहे. ७५ पोलीस अधिकारी, ९०० पोलीस अंमलदार, ९१९ गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तावर होते.
तुळजापूर येथे नवरात्र उत्सवात दररोज लाखो भाविकांची उपस्थिती असल्याने मोठ्या संख्येने बंदोबस्त पुरविण्यात आला होता. संपुर्ण नवरात्र उत्सवादरम्यान भाविकांची मोठ्या संख्येने होणारी गर्र्दी लक्षात घेता योग्यप्रकारे वाहतूक नियमन व पार्कींग व्यवस्था करण्यात आली होती. यात्रा कालावधीत सुमारे १० ते १२ लाख भाविकांनी आई तुळजाभवानी देवीचे दर्शनासाठी तुळजापूर येथे भेट दिली. २८ व २९ ऑक्टोबर रोजी साजरी झालेल्या कोजागिरी पोर्णिमेनिमीत्त सुमारे ३ लाख भाविकांनी आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. यात्रेदरम्यान संभाव्य गर्र्दी लक्षात घेता पोलीस अधिक्षक श्री. कुलकर्र्णी यांच्या मार्गदर्शनाखाली गर्र्दीचे योग्य व्यवस्थापन करण्यात आले. त्यामुळे यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
या यात्रेदरम्यान राज्यातुन सुमारे ५०० एसटी महामंडाळाचे बसेस तर कर्नाटक व तेलंगना राज्यातुन सुमारे ४०० ते ५०० बसेस सोडण्यात आल्या होत्या. तसेच यात्रेदरम्यान मराठा आरक्षण मागणीसाठी संपुर्ण राज्यात रास्तारोको आंदोलने चालु होती. या काळामध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र, तेलंगणा या राज्यातुन दशर्नासाठी आलेल्या भाविकांच्या वाहनावर दगडफेक होऊ नये किंवा त्या भाविकांना कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये, याची पुरेपुर खबरदारी जिल्हा पोलीस प्रशासनाने घेतली होती. पोलीस बंदोबस्तामध्ये बाहेरील राज्यातील भाविकांना घेवून जाणारे बसेस यांना उमरगा तालुक्यातील राज्य सीमेवर सुखरुपरित्या पोहचविण्यात आले. सदर आंदोलनाची कुठलीही झळ भाविकांना बसू दिली नाही.
संपुर्ण नवरात्र उत्सवादरम्यान पोलीस अधिक्षक यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव यांच्या पथकानेही चोरी, जबरी चोरी, पाकीटमारी यासारख्या घटनांना आळा घालण्यासाठी परिणामकारक गस्त राबविली. त्याचा परिणाम म्हणून यावर्षी चैन स्नॅचिंग, मोबाईल स्नॅचिंगची १ आणि मोटरसायकल व इतर चोरीच्या केवळ २ घटना घडल्या. ज्याचे प्रमाण गेल्या वर्षीचे तुलनेत अतिशय कमी असून यावर्षी जबरी चोरी, चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यात्रा कालावधी दरम्यान एकूण ७५ रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पकडून त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्र्णी, अपर पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत, तुळजापूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख, तुळजापूर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे, सपोनि ज्ञानेश्वर कांबळे, सपोनि श्री. चास्कर, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, तसेच सपोनि मनोज निलंगेकर, सपोनि शैलेश पवार, पोउपनि संदीप ओहोळ व त्यांच्या पथकाने तसेच बंदोबस्तातील इतर अधिकारी व अमंलदार यांनी पार पाडली आहे.