छत्रपती संभाजीनगर : पैठण रोडवर नक्षत्रवाडीजवळ एका भरधाव ट्रकने ३ कार, ७ दुचाकी आणि १ रिक्षा उडवल्याची घटना घडली.
या अपघातामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर स्थानिकांची प्रचंड गर्दी झाली. शेकडो लोक घटनास्थळी दाखल झाले. अपघातामधील जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या अपघातामध्ये ६ जण जखमी झाले आहेत.
धुळे-सोलापूर हायवेवरून पैठण रोडवर ट्रक उतरत होता. त्यावेळी हा भीषण अपघात झाला. उतारावरून खाली उतरत असताना ट्रकने ५ कार, ७ दुचाकी आणि १ रिक्षा चिरडल्या. या अपघातामध्ये १ महिला जागीच ठार झाली तर ३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या अपघातामध्ये ६ जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे.