25.1 C
Latur
Friday, January 17, 2025
Homeमहाराष्ट्रपुण्यात उभारला जरांगेंचा मेणाचा पुतळा

पुण्यात उभारला जरांगेंचा मेणाचा पुतळा

पिंपरी-चिंचवड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या सात महिन्यांपासून लढा देणारे मनोज जरांगे चर्चेत आले असून, त्यांच्या आंदोलनाची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचली आहे. अंतरवालीमध्ये झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जनंतर जरांगे यांचे आंदोलन अधिक चर्चेत आले. दरम्यान, जरांगे यांच्या याच आंदोलनाची दखल घेत आणि समाजासाठी काहीतरी करण्याच्या इच्छेने पुण्यातील एका बाप-लेकाने चक्क हुबेहूब मनोज जरांगे यांच्यासारखा दिसणारा मेणाचा पुतळा तयार केला आहे.

पुण्यातील एकविरा कार्ला येथे वॅक्स म्युझियममध्ये मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटलांचा मेणाचा पुतळा साकारण्यात आला आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे निघाले आहेत. मुंबईकडे निघालेल्या त्यांच्या पायी दिंडीचा लोणावळ्यात चौथा मुक्काम होणार आहे. त्यामुळे, मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाची इतिहासात नोंद व्हावी, यासाठी प्रत्येक मराठा होईल तो प्रयत्न करत आहे. अशातच पुण्यातील मावळ तालुक्यातील बाप-लेकाने मनोज जरांगे यांच्यासारखा दिसणारा मेणाचा पुतळा तयार केला आहे.

पाच फूट सात इंचाचा पुतळा…
कार्ला येथील अशोक म्हाळसकर आणि ऋषी म्हाळसकर या बाप-लेकांनी हा मेणाचा पुतळा तयार केला आहे. यासाठी त्यांना तीन महिन्यांचा वेळ लागला. मनोज जरांगे पाटील यांच्या परवानगीने हा पुतळा उभारण्यात आला असून, पुतळ्याची उंची पाच फूट सात इंच इतकी आहे. तर, हुबेहूब जरांगे पाटील साकारण्याचा प्रयत्न म्हाळसकर कुटुंबीयाने केला आहे. त्यामुळे, हा पुतळा पाहण्यासाठी अनेक मराठा युवक येथे येऊ लागले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR