19 C
Latur
Sunday, December 29, 2024
Homeधाराशिवचारित्र्याच्या संशयावरून चटणीचे पाणी टाकून विवाहितेला मारहाण

चारित्र्याच्या संशयावरून चटणीचे पाणी टाकून विवाहितेला मारहाण

धाराशिव : प्रतिनिधी
चारित्र्यावर संशय घेऊन डोक्यात चटणीचे पाणी टाकून विवाहितेला मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील वडार गल्ली येथे दि. २१ जानेवारी रोजी घडली. या प्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाणे येथे दि. २२ जानेवारी रोजी सासरच्या चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव शहरातील वडार गल्ली येथील विवाहिता भाग्यश्री शिवाजी पवार (वय ३४) यांच्या चारित्र्यावर सासरचे लोक संशय घेत होते. त्यांचा दिर आरोपी तानाजी मारुती पवार, सासु शांताबाई मारुती पवार, नणंद श्रीदेवी नेहरु चौगुले, रा. रविवार पेठ, सोलापूर, चुलत सासु अंजना दुर्गाप्पा पवार यांनी दि. २१ जानेवारी रोजी भाग्यश्री पवार यांना मारहाण केली. त्यांच्या चारित्र्यावर संशय घेवून त्यांच्या डोक्यात चटणीचे पाणी टाकून शिवीगाळ केली व लाथाबुक्यांनी, लोखंडी गजाने डाव्या हातावर मारहाण करुन गंभीर जखमी केले. जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी भाग्यश्री पवार यांनी दि. २२ जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पोलीस ठाणे येथे कलम ३२६, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR