सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या गावच्या यात्रेसाठी दोन दिवसांच्या महाबळेश्वर दौ-यावर गेले आहेत. यात्रेसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांचे ग्रामस्थांनी ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केले. याठिकाणी मुख्यमंत्री ग्रामसभादेखील घेणार आहेत.
महाबळेश्वर तालुक्यातील दरे, तांब, उचाट आदींसह पंधरा गावांचे ग्रामदैवत उत्तरेश्वर देवाची यात्रा सध्या सुरू आहे. या यात्रेसाठी मुख्यमंत्री दोन दिवस आपल्या मूळ गावी आले आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर यात्रेसाठी ते दुस-यांदा गावी आल्याने गावात मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. या दौ-यात ते सातारा जिल्ह्यातील विकासकामांची माहिती घेणार आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बुधवारी सकाळी ग्रामसभा देखील होणार आहे. यात्रेशिवाय मुख्यमंत्र्यांचा अन्य कोणताही कार्यक्रम होणार नाही.