20.5 C
Latur
Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रखारघरमध्ये आंदोलन करण्याची जरांगेंना सूचना

खारघरमध्ये आंदोलन करण्याची जरांगेंना सूचना

मुंबई : मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे यासाठी मनोज जरांगे मुंबईतील आझाद मैदानाकडं निघाले आहेत. पण आता हायकोर्टाच्या आदेशानंतर आझाद मैदान पोलिसांनी मनोज जरांगेंना मुंबईत न येण्यासाठी नोटीस पाठवली आहे. आझाद मैदानाऐवजी त्यांना नवा पर्यायही पोलिसांनी दिला आहे.

मुंबई पोलिसांनी मनोज जरांगेंना आझाद मैदान आणि शिवाजी पार्क ऐवजी नवी मुंबईतील खारघर इथल्या मैदानात आंदोलन करावं, हा पर्याय दिला आहे.

पोलिसांच्या नोटिशीतील मुद्दे…

१) मनोज जरांगेंनी मुंबईत येऊ नये.

२) आंदोलनामुळे मुंबईतले जनजीवन विस्कळीत होईल.

३) पनवेलच्या खारघरमधील मैदानात जरांगेंनी आंदोलन करावे.

४) मुंबईतल्या कुठल्याही मैदानात एवढे आंदोलक बसू शकतात एवढी क्षमता नाही.

५) आंदोलनामुळे मुंबईत वाहतुकीची समस्या आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल.

६) दादरच्या शिवाजी पार्क आणि आझाद मैदानात उपोषणाची परवानगी नाकारण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR