पुणे : पुणे विमानतळ सोने तस्करीचा अड्डा बनत असल्याचे मागील काही दिवसांत झालेल्या कारवाईतून समोर आले आहे. त्यातच आता पुन्हा एकदा दुबईहून तस्करी करून आणलेले ६ किलो ९१२ ग्रॅम सोने महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्त केले. सोने तस्करी प्रकरणात एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली. या सोन्याची किंमत साधारण साडेतीन कोटी आहे.
दुबईहून सोन्याची तस्करी करून एक महिला पुणे विमानतळावर येणार असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. त्यानुसार पथकाने विमानतळावर सापळा लावला होता. दोघांची तपासणी केली असता त्यांच्याकडे सोने आढळून आले.
त्यानुसार महिलेसह तिच्याबरोबर असलेल्या व्यक्तीला अटक करण्यात आली. आरोपींनी ६ किलो ९१२ ग्रॅम वजन असलेल्या सोन्याची पावडर केली होती. ती पावडर त्यांनी पट्टा आणि पाकिटात लपवून ठेवली होती.