26.4 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeलातूरविनोदी, बोलक्या बाहुल्यांच्या खेळाने मने जिंकली

विनोदी, बोलक्या बाहुल्यांच्या खेळाने मने जिंकली

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
कॉमेडीकिंग बालाजी सुळ यांची रंगतदार कॉमेडी व राहूल भालेराव यांचा बोलक्या बाहुली च्या खेळाने प्रेक्षकांची मने ंिजकली. राजकीय नेते, प्रसिद्ध अभिनेते व उखाण्याने बालाजी सुळ तर बोलक्या बाहुलीच्या खेळातून सामाजिक संदेशासह विनोद करीत राहूल भालेराव या दोघांनी गांधीबाबा यात्रेत धमाल उडवून दिली.
   गांधी बाबा यात्रेनिमित घेण्यात आलेल्या या कॉमेडी शोचा शुभारंभ पोलिस उपनिरक्षिक चंदनंिसह परिहार यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी आरोग्य अधिकारी डॉ. तुराबअली देशमुख हे होते. याप्रसंगी बालाजी सुळ व राहुल भालेराव यांच्या अफलातून हास्य विनोदामुळे प्रेक्षकांनी त्यांना अक्षरश: खांद्यावर घेतले होते. यावर्षी यात्रा कमिटीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात शेतकरी मेळावा मार्गदर्शन व सत्कार,महिला मेळावा चिकित्सा शिबीर व महिला सन्मान सोहळा घेण्यात आला. त्यानंतर तरूणांसाठी म्हणून कॉमेडीकिंग बालाजी सुळ व बोलक्या बाहुल्यांचे राहुल भालेराव यांचा शो आयोजित करण्यात आला होता. यात बोलक्या बाहुल्यांचा खेळ करणारे राहुल भालेराव यांनी आपल्या खेळातून लहान मुलांसह आबालवृद्धांना खळखळून हसवले.
 तर कॉमेडीकिंग बालाजी सुळ यांनी नसिरुद्दीन शहा, सुनिल शेट्टी, ऋत्विक रोशन, अजय देवगन, मकरंद अनासपुरे व नटसम्राट नाना पाटेकर यांच्या आवाजाने प्रेक्षकांना मनोरंजन केले. तसेच अजित पवार, शरद पवार, किरिट सोमय्या यांच्या आवाजातून विनोद निर्मिती केली तर शेवटी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या बहारदार आवाजातून कार्यकृम व आयोजकांना शुभेच्छा दिल्या. याचे प्रेक्षकांनी जोरदार टाळ्यानी स्वागत केले. गांधीबाबा यात्रेत विविध कार्यक्रमामुळे यात्रेत मोठी रंगत आली असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले. पीएस आय परिहार यांनी शुभेच्छा दिल्या.या कार्यकृमाचे प्रास्ताविक वसंतराव किडीले यांनी केले. सुत्रसंचालन पी.एस.कदम यांनी केले. तर आभार प्रदर्शन गांधी बाबा यात्रेचे संयोजक पत्रकार शकील देशमुख यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR