21.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रमुंबईत सुरू होणार ईडीचे कार्यालय

मुंबईत सुरू होणार ईडीचे कार्यालय

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आपल्या तत्परतेने आतापर्यंत हजारो कोटी रुपयांच्या बेकायदेशीर मालमत्ता ताब्यात घेतल्या आहेत. मात्र, ईडीला अद्याप स्वत:चे कार्यालय नव्हते. त्यांची कार्यालये भाड्याने घेतलेल्या ठिकाणी होती.

मात्र, आता त्यांना आर्थिक राजधानी मुंबईत मोठे ऑफिस मिळणार आहे. ईडीला मुंबईतील कार्यालयासाठी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मध्ये ३६२ कोटी रुपयांचा भूखंड देण्यात आला आहे. सध्या मुंबईत ईडीचे कार्यालय आणि स्टोअर रूम तीन वेगवेगळ्या इमारतींमध्ये आहेत. यापैकी दोन बॅलार्ड इस्टेटमध्ये तर एक कार्यालय वरळी येथे आहे.

ईडीला अर्धा एकरचा भूखंड देण्यात आला आहे. ज्यातून १०,५०० स्क्वेअर मीटरवर इमारत बांधली जाऊ शकते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) १०,५०० चौरस मीटरसाठी ३.४ लाख रुपये प्रति चौरस मीटर आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या मुंबईत ईडीची कार्यालये असलेल्या तीन इमारतींमध्ये इतर खासगी कंपन्यांचीही कार्यालये आहेत. अशा परिस्थितीत एजन्सीला तिथे येणा-या-जाणा-यांवर लक्ष ठेवणे अवघड जाते. बॅलार्ड इस्टेटमध्ये ईडीची कार्यालये भाड्याने आहेत. मयत ड्रग्ज तस्कर इक्बाल मिर्चीच्या जप्त केलेल्या मालमत्तेत वरळीचे कार्यालय आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने ते जप्त केले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR