22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीयनितीश कुमारांची मुख्यमंत्री म्हणून शेवटची इनिंग

नितीश कुमारांची मुख्यमंत्री म्हणून शेवटची इनिंग

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा राष्ट्रीय जनता दल सोडून भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सामील झाले आहेत. नितीश कुमार यांनी भाजपासोबत जात ९ व्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दरम्यान, नितीश कुमार यांनी भाजपासोबत हातमिळवणी केल्यानंतर प्लुरल्स पार्टीच्या प्रमुख पुष्पम प्रिया यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. बिहारच्या राजकारणात थेट मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून समोर आलेल्या पुष्पम प्रिया चौधरी यांनी सोशल मीडियावर नितीश कुमार यांचे अभिनंदन केले आणि त्यांना टोलाही लगावला आहे.

नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवल्याशिवाय मास्क काढणार नाही, अशी शपथ घेतलेल्या पुष्पम प्रिया चौधरी यांनी म्हटले आहे की नितीश कुमार यांची मुख्यमंत्री म्हणून ही शेवटची इंिनग आहे, यात शंका नाही. वीस महिने बाकी आहेत. ते निरोगी राहू देत, कारण बिहारला त्यांच्या वक्तव्यामुळे आणि वागण्यामुळे आणखी पेच सहन करावा लागू नये. जाता-जाता ते राज्याच्या हिताचे काहीतरी चांगले करतील, अशी आशा आहे. त्यांचे अभिनंदन.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR