सोलापूर – राहुरी येथील वकील दांपत्याच्या हात्येच्या निषेधार्थ सोलापूर वकिल संघाने मंगळवारी दि. 30 जानेवारी 2024 रोजी अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला. सर्व वकिलांनी संपूर्ण दिवसभर लाल फीत लावून कोर्ट कामकाजात सहभाग नोंदविला.
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी वकिल संघाचे सदस्य ॲड .आढाव पती पत्नीची निर्गुण पणे हत्या 25 जानेवारी 2024 रोजी करण्यात आली. संपूर्ण राज्यभर या घटनेचा निषेध , वकील बांधवांनी नोंदवला. त्याचाच भाग म्हणून सोमवारी सर्व वकिलानी सोलापूरात कोर्ट कामकाजा पासून एकदिवस आलिप्त राहून निषेध नोंदवला तर आज सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयातील सर्व वकिलांनी आपल्या काळ्या कोटावर लाल फीत लावून कामकाजात सहभाग नोंदविला व आपले लक्ष वेधले.
वकिलावरती वारंवार होणारे हल्ले हे निश्चितपणे चिंतेची बाब आहे, यासंदर्भात वकिलांच्या संरक्षणार्थ कायदा तातडीने होणे गरजेचे आहे या बाबत शासनाने तत्परता दाखवत तातडीने अध्यादेश पारित करून वकिलाना दिलासा द्यावा अन्यथा या बाबतीत मोठे आंदोलन उभारावे लागेल असे सोलापूर वकील संघाचे अध्यक्ष ॲड. सुरेश गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.