26.2 C
Latur
Saturday, January 11, 2025
Homeसोलापूर‘पेपरफुटी प्रकरणी’ आम आदमी पार्टीचे आक्रोश आंदोलन

‘पेपरफुटी प्रकरणी’ आम आदमी पार्टीचे आक्रोश आंदोलन

सोलापूर : आज राज्यात जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटण्याचे जवळपास रोजचे झाले आहे. पेपर फुटी प्रकरणात आम आदमी पार्टीने आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांनी आंदोलन केल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी कुठलेही ठोस आश्वासन आंदोलनाच्या शिष्टमंडळाला दिले नाही, यामुळे आम आदमी पार्टीने राज्यभर “आक्रोश मोर्चा” काढून सरकारचे लक्ष वेधले आहे.

हमखास सरकारी नोकरी मिळत असलेल्या स्पर्धा परीक्षांच्या तरुणांनी आज कोणाकडे न्यायाची अपेक्षा करायची असा प्रश्न आम्ही सरकारला विचारत आहोत. जर हे पेपर फुटीचे प्रकरण यापुढेही चालू राहिले तर आम आदमी पार्टी उग्र आंदोलन करेल असा इशारा आम्ही सरकारला देतो आहे.असे आप, महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष,अजित फाटके पाटील म्हणाले.

देवेंद्र फडवणीस हे गृहमंत्री असताना सुद्धा या महत्वाच्या पेपर फुटी प्रकरणावर कुठल्याही प्रकारची कठोर कारवाई अजून तरी फडवणीस यांनी केलेली नाही, त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर संशय निर्माण होत आहे असा स्पष्ट आरोप आम आदमी पार्टीचा आहे.
आम आदमी पार्टीच्या राज्यस्तरीय आक्रोश मोर्चात राज्यातील आम आदमी पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, स्पर्धा परीक्षा देत असलेले विद्यार्थी आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘ सदोष’ तलाठी भरतीची परीक्षा रद्द करून, तलाठी तसेच सर्व परीक्षा ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग’ मार्फत घेतल्या जाव्यात . नोकभरती परीक्षेत झालेल्या ‘पेपरफुटी’ ची चौकशी करण्यासाठी ताबडतोब मा. न्यायालयाच्या निगराणीखाली विशेष चौकशी समिती”ची स्थापना करून पुढील ४५ दिवसांत समितीला अहवाल सादर करावयास सांगावा , पेपर फुटीच्या विरोधात कठोर कायदे बनवावेत. पेपरफुटीतील गुन्हेगारांना ‘जन्मठेपेची शिक्षा’ व रु. १० कोटी इतका कठोर दंड आकारण्याचा कायदा बनवावा.

सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण कायमचे रद्द करण्यात यावे.,सोलापूर जिल्हा व शहर टीम च्या वतीने पुनम गेट जिल्हा परिषद येथे आंदोलन घेण्यात आले.या वेळेस, आम आदमी पार्टी सोलापूर जिल्हाध्यक्ष एम. पाटील, शहराध्यक्ष निहाल किरनळ्ळी, जिल्हा शहर उपाध्यक्ष श्रीकांत वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष प्राजक्त चांदणे,युवाध्यक्ष निलेश संगेपाग, बंडू मोरे, शहर संघटक जुबेर हिरापुरे, शहर महासचिव मल्लिकार्जुन पिलगेरी,शहर सचिव रहीम शेख,अल्ताफ तांबोळी, शहर संघटक आनंद जाधव,शहर कोशाध्यक्ष सुचित्रा वाघमारे,शहर सहसंघटक महमूद गब्बूरे, मदनी चाचा,अरविंद येलपले,सतीश लोंढे, बसवराज सारंगमठ , प्रसाद बाबानगरे, आकाश गायकवाड, श्रीशैल डोणे आदी पदाधिकारी,कार्यकर्ते आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR