28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयराष्ट्रपतींचे अभिभाषण हे निवडणुकीचे भाषण : काँग्रेस

राष्ट्रपतींचे अभिभाषण हे निवडणुकीचे भाषण : काँग्रेस

नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर संसदेच्या संकुलात काँग्रेस खासदारांनी टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेसने याला निवडणुकीचे भाषण म्हटले आहे. बेरोजगारीसारख्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काँग्रेसच्या खासदारांनी केला. केरळमधून निवडून आलेले काँग्रेस खासदार थरूर म्हणाले की, सरकारने राष्ट्रपतींना देण्यासाठी निवडणुकीचे भाषण लिहिले आहे, त्यांनी बेरोजगारीबद्दल बोलले नाही. ही एकतर्फी कथा आहे जी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करते. थरूर यांच्या म्हणण्यानुसार, ‘माझा विश्वास आहे की, लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करताना लोकांचा विचार करावा लागेल.

आसाममधून निवडून आलेले काँग्रेसचे लोकसभेचे खासदार गौरव गोगोई म्हणाले की, राष्ट्रपतींच्या वक्तव्यात भारताच्या वास्तविकतेची झलक आम्हाला दिसली नाही. ऐतिहासिक महागाई आणि बेरोजगारी दिसत नव्हती. सरकारने देशातील सत्य लपवण्याचा आणि दडपण्याचा पुरेपूर प्रयत्न केल्याचे दिसत आहे. चंदीगडच्या महापौर निवडणुकीत ज्याप्रमाणे लोकशाहीला चिरडले गेले, त्याचप्रमाणे राष्ट्रपतींच्या भाषणात आर्थिक आणि सामाजिक मुद्द्यांचाही चुराडा झाला. ते म्हणाले की, मला वाटते की पंतप्रधानांच्या जवळच्या लोकांचा ज्या प्रकारे फायदा होत आहे, तसाच फायदा त्यांना यंदाच्या अर्थसंकल्पातूनही होत राहील.

काँग्रेस खासदार शक्ती सिंह गोहिल म्हणाले की, १० वर्षांपूर्वी पंतप्रधानांनी अनेक आश्वासने दिली पण एकही पूर्ण केले नाही. जेव्हा त्यांना कामाच्या जोरावर मते मिळत नाहीत, तेव्हा ते मत मिळविण्यासाठी प्रभू रामाच्या नावाचा वापर करत आहेत. काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील म्हणाल्या की, त्यांचे संबोधन ऐकून भारताचा जन्म २०१४ नंतरच झाल्याचे दिसते. त्यांनी आपल्या भाषणात मणिपूरमधील घटना आणि बेरोजगारी आणि महागाई यांचाही उल्लेख केला असता तर बरे झाले असते.

सरकारच्या काही मित्रांना रोजगार
खासदार दानिश अली म्हणाले की, राष्ट्रपतींच्या भाषणात विशेष काही नाही. सरकारने सांगितले की रोजगार दिला, पण कोणाला? ते उपहासाने म्हणाले की हो, सरकारच्या काही मित्रांना रोजगार मिळाला आहे. सरकारकडे सांगण्यासारखे काही नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR