22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीय४० हजार बोगी होणार ‘वंदे भारत’प्रमाणे आधुनिक

४० हजार बोगी होणार ‘वंदे भारत’प्रमाणे आधुनिक

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. लोकसभा निवडणुकीआधी मांडल्या गेलेल्या मिनी बजेटमध्ये सीतारामन यांच्या पोतडीतून विविध क्षेत्रांसाठी आकर्षक घोषणा बाहेर पडल्या. रेल्वेचे ४० हजार डबे ‘वंदे भारत’ प्रमाणे करण्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली. विकसित भारताचा पूर्ण अर्थसंकल्प जुलैमध्ये मांडणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.

४० हजार रेल्वेबोगींचे वंदे भारत दर्जात रुपांतर होईल. नमो भारत आणि मेट्रोमुळे शहरांतील अंतर कमी झाले आहे. या दोन्ही रेल्वे सेवांचा विस्तार केला जाईल. प्रवासी गाड्यांच्या संचालनात सुधारणा होईल, तसेच प्रवाशांची सुरक्षा वाढून प्रवासाचा वेगही अधिक होईल. मेट्रोचे जाळे वाढवण्यावर सरकारचा भर राहील, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. दुसरीकडे, विजेवरील बसेसना प्राधान्य देण्यात येणार असून जास्तीत जास्त चार्जिंग स्टेशन्ससाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

देशात नवीन १४९ विमानतळं उभारणार असून ५१७ नवे विमानमार्ग प्रस्तावित आहेत. विमान वाहतूक क्षेत्राचा मागील १० वर्षांत कायापालट करण्यात आला असून येत्या काही वर्षांत विमानतळांची संख्या दुप्पट होणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR