34.2 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeअंतरराष्ट्रीयपाकिस्तान पुन्हा विभाजनाच्या मार्गावर

पाकिस्तान पुन्हा विभाजनाच्या मार्गावर

इस्लामाबाद : बलुच लिबरेशन आर्मीने त्यांना मदत करणा-या अन्य संघटनांच्या मदतीने पाकिस्तानातील लष्करी तळांवर हल्ला केला. बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानच्या माच आणि बोलन शहरावर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानने मात्र हा दावा फेटाळून लावला. बलुच लिबरेशन आर्मीच्या ताब्यानंतर पाकिस्तानचे पुन्हा एकदा दोन तुकडे पडणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. बलुच लिबरेशन आर्मीने आपला दावा खरा आहे हे सिद्ध करण्यासाठी पाकिस्तानी आणि आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमांना निमंत्रित केले.

बलुच लिबरेशन आर्मीमुळे १९७१ प्रमाणे पाकिस्तानचे पुन्हा एकदा दोन तुकडे पडू शकतात. एका नव्या देशाची निर्मिती होऊ शकते. त्यांच्याकडून पाकिस्तानी सैन्य तळांवर हल्ले सुरु आहेत. बलूच लिबरेशन आर्मी पाकिस्तानचा पश्चिमी प्रांत बलूचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत आहे.

बोलन आणि माच शहरांवर हल्ला करुन ही दोन्ही शहर ताब्यात घेतल्याचा बलुच लिबरेशन आर्मीचा दावा आहे. माच शहरावरील हल्ल्यात पाकिस्तानचे ४५ सैनिक आणि गॅबमध्ये १० लोकांचा खात्मा केला. परंतु, पाकिस्तानने हा दावा फेटाळून लावला. आमचा एकही सैनिक मारला गेलेला नाही, असे पाकिस्तानने म्हटले आहे.

‘ऑपरेशन दारा-ए-बोलन’

माच आणि बोलन शहरावर ताबा मिळवण्यासाठी बलुच लिबरेशन आर्मीने ‘ऑपरेशन दारा-ए-बोलन’ केले. या शहरांच्या आसपासच्या परिसरावर ताबा मिळवला. या ऑपरेशनमध्ये जैसेमजीद ब्रिगेड, फÞतेह स्क्वाड आणि स्पेशल टॅक्टिकल ऑपरेशन स्क्वाड सहभागी झाले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR